ज्योतिरादित्यांना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा नवा डाव ! MP मधून राज्यसभेवर जाऊ शकतात प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्योतिरादित्य सिंधिया यांचा राज्यसभेचा मार्ग रोखण्यासाठी आता प्रियंका कार्ड खेळले जात आहे. असे मानले जात आहे की प्रियंका गांधी यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठविण्याच्या सूचनेमागे ज्योतिरादित्य यांना मागे ठेवण्याचे राजकारण सुरु आहे अशी चर्चा सुरु आहे. तर मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यातल्या कटुतेच्या दरम्यान राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कुरघोडीला सुरुवात झाली आहे.

विशेष म्हणजे मध्यप्रदेशातून राज्यसभेच्या तीन जागा खाली होणार आहेत. यापैकी दोन काँग्रेस आणि एक भाजपा कडे जाणार आहे. कॉंग्रेसच्या दोन जागेंवर यापूर्वीच ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांनी दावा केला आहे. परंतु हाय कमांडकडून आता प्रियांका गांधी यांच्या नावाचीही चर्चा केली जात आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही दिग्गज नेत्यांपैकी एकाला सध्या सभागृहात जाण्याची संधी सोडावी लागणार आहे. सध्या या जागांवर दिग्विजय सिंह, प्रभात झा आणि सत्यनारायण जटिया सदस्य आहेत.

२०२० च्या अखेरीस राज्यसभेच्या ६८ जागा देशभरातून रिक्त झाल्या आहेत, या निवडणुकीत कॉंग्रेसला आपल्या बऱ्याच जागा गमवाव्या लागणार आहेत असे समोर येत आहे. तसेच पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यांतून प्रियांका गांधी वाड्रा, ज्योतिरादित्य सिंधिया, दिग्विजय सिंह यासारख्या अनेक दिग्गजांना काँग्रेस राज्यसभेत पाठविण्याचा विचार करीत आहे. मध्य प्रदेशातही प्रियांका गांधी यांना राज्यसभेवर पाठविण्याची मागणी होत आहे. हाय कमांडने सीएम कमलनाथ यांच्या दिल्ली दौर्‍यादरम्यान त्यांच्याशीही चर्चा केली असल्याचे समोर येत आहे.

You might also like