विवेक ओबेरॉयचा मेहुणा आदित्य अल्वाच्या बंगल्यावर छापेमारी, 4 एकरमध्ये होत होत्या रेव्ह पार्ट्या, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंमली पदार्थांच्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) कर्नाटकचे दिवंगत मंत्री जीवनराज अल्वा यांचा मुलगा आदित्य अल्वा यांच्या बंगल्यावर छापा टाकला. सीसीबीने राज्याच्या राजधानीत अंमली पदार्थांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्यापासून या प्रकरणातील आरोपी आदित्य अल्वा फरार आहे. आदित्य हा चित्रपट अभिनेता विवेक ओबेरॉय याचा मेहुणा आहे. त्याचे वडील कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री रामकृष्ण हेगडे यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्या काळातील कट्टर नेते होते. कन्नड चित्रपटाची अभिनेत्री रागिनी द्विवेदी, संजना गलराणी, रेव्ह पार्टीचे संयोजक वीरन खन्ना, सेल्समन राहुल आणि आरटीओ लिपिक बीके रवि शंकर आदींना अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत नऊ आरोपींना अटक
पोलिस सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक दिवस आधी सोमवारी कोर्टाने रागिनी द्विवेदीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

चार एकरांच्या बंगल्यावर होत होत्या रेव्ह पार्ट्या
सीसीबीने सांगितले की, सर्च वॉरंट मिळवून ‘हाऊस ऑफ लाइफ’ नावाच्या आदित्य अल्वाच्या बंगल्यावर छापा टाकण्यात आला. चार एकरात पसरलेल्या या बंगल्यात पार्टी आयोजित करण्यात आल्या होत्या ज्यात कन्नड चित्रपटांमधील मोठे दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एका महिलेसह तीन जणांना मोठ्या प्रमाणात सिंथेटिक ड्रॅगसह अटक केली. हे लोक कन्नड चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रींना हा पुरवठा करीत असत. त्यानंतर सीसीबीने हे प्रकरण आपल्या हातात घेतले.

दरम्यान, आजकाल चित्रपटसृष्टीत मादक पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बॉलिवूडमध्ये ड्रग्स प्रकरणातच फिल्म अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर आता दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये मादक पदार्थांच्या व्यापाराची आणि रेव्ह पार्ट्यांची प्रकरणेही समोर येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like