रेल्वे स्थानकांवर पुन्हा उघडले रेस्टॉरन्ट आणि फुडस्टॉल, बुकस्टॉलपासून औषधाची दुकाने सुद्धा उघडण्याचे निर्देश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – रेल्वेने श्रमिक स्पेशल गाड्या आणि विशेष प्रवासी गाड्या चालवल्यानंतर आता रेल्वे स्टेशनांवरील दुकाने पुन्हा उघडली आहेत. रेल्वे बोर्डाद्वारे स्टेशन्सवरील जेवढी कॅटरिंग युनिट, बहुउद्देशीय स्टॉल आदी आहेत, ते सर्व तात्काळ उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आदेशानुसार सर्व कॅटरिंग आणि वेंडिंग युनिट तात्काळ उघडण्यात आली आहेत. यासोबतच स्टेशनवरील बुकस्टॉल, बहुउद्देशीय स्टॉल, औषधाची दुकाने आदि सुद्धा तात्काळ उघडली जात आहेत.

रेल्वे बोर्डाचे डायरेक्टर फिलिप वर्गीस यांनी सर्व रेल्वे झोनसाठी आदेश जारी करत रेल्वे स्थानकांवर खाण्या-पिण्याचे स्टॉल पुन्हा उघडण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार रेल्वे स्थानकांवरील सर्व कॅटरिंग आणि वेंडिंग युनिट तात्काळ उघडले जात आहेत. सोबतच स्टेशनांवर पहिल्याप्रमाणे दुकाने, बुक स्टॉल आणि केमिस्ट शॉप उघडली जातील. रेस्टॉरन्ट, फुड प्लाझामध्ये बसून खाण्याची सुविधा असणार नाही, टेक-अवे सुविधा असेल.

आदेशात म्हटले आहे की, या विक्रेत्यांमध्ये पॅक केलेले सामान, जरूरी सामान, औषधे इत्यादींची दुकाने तसेच बुक स्टॉल इत्यादी सामिल असतील, जी देशात कोविड-19 पसरल्यानंतर ताबडतोब बंद करण्यात आली होती. रेल्वे झोनने स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे स्टॉल उघडण्यासाठी बोर्डाकडून आवश्यक निर्देश घेतले आहेत. आदेशात म्हटले आहे की, झोनल रेल्वे आणि आयआरसीटीसीला सांगण्यात आले आहे की, रेल्वे स्टेशनावंर सर्व स्टेटिक कॅटरिंग आणि वेंडिंग युनिट्स तात्काळ उघडण्यासाठी पावले उचलण्यात यावीत. तर फुड प्लाझा, द्रवपदार्थ केवळ घेऊन जाण्याची परवानगी आहे.

श्रमिक एक्सप्रेसबाबत मोठा बदल
गृह मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन बाबत 1 मे रोजी जारी केलेले सर्क्युलर परत घेण्यात आले आहे. नव्या सर्क्युलरनुसार आता श्रमिक ट्रेन चालवण्यासाठी राज्य सरकारांच्या सहमतीची गरज नाही. यापूर्वी ज्या राज्यांसाठी श्रमिक ट्रेन चालवल्या जात होत्या, तेथील राज्य सरकारांची सहमती आवश्यक होती. परंतु, मागील काही दिवसात रेल्वे आणि रेल्वेमंत्र्यांनी सतत सांगूनही अनेक राज्यांकडून परवानगी दिली जात नव्हती. यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

यापूर्वी केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी म्हटले होते की, देशभरात अडकलेल्या प्रवासी कामगारांना एका स्थानावरून दुसर्‍या स्थानावर पोहचवण्यासाठी भारतीय रेल्वेने शनिवारपर्यंत 1 हजार 34 श्रमिक स्पेशल ट्रेन चालवल्या. उत्तर प्रदेश आणि बिहारने सकारात्मक पावले उचलली आणि चालवण्यात आलेल्या एकुण 80 टक्के ट्रेन याच राज्यांसाठी होत्या. त्यांनी दावा केला की, राज्य सरकारांनी जशी ट्रेनची मागणी केली त्यांना तीन ते पाच तासात ट्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.