‘राम मंदिर ट्रस्ट’ मध्ये ‘देवतांचे वकिल’ यांच्यावर मोठी जबाबदारी, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ नं झालाय सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देवांचे वकील म्हणजेच के. पराशरण यांना अयोध्येत राम मंदिर निर्माणासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना ट्रस्ट चे सदस्य बनवण्यात आले असून त्यांच्या दिल्लीमधील ग्रेटर कैलास येथील राहत्या घरास अधिकृत कार्यालय बनवण्यात आले आहे. ट्रस्ट संदर्भातील सर्व घडामोडी येथूनच होणार आहेत. पीएम मोदी यांनी बुधवारी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान राम मंदिर ट्रस्ट बनवण्यात यावे अशी माहिती दिली होती.

के. श्रीनंगम हे तामिळनाडूमधील आहेत. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९२७ रोजी झाला होता. के. श्रीनंगम यांचे वडील केशव अय्यंगर हे देखील वकील होते, म्हणून त्यांना वकिलीचा वारसा लाभला आहे. केशव अय्यंगार यांनी सुप्रीम कोर्टातही सराव केला आहे. तथापि, श्रीनंगम यांनी आपल्या वडिलांना मागे टाकले असून त्यांचा दांडगा अनुभव या क्षेत्रात आहे. पराशरण यांनी १९५८ मध्ये वकिलीची सुरुवात केली होती. श्रीनंगम यांनी १९८३ ते १९८९ पर्यंत अ‍ॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिले. तसेच ते राज्यसभेचे सदस्यही राहिले आहेत. पराशरण यांना मोहन, सतीश यांचे तीन मुलं मोहन, सतीश आणि बालाजी हे तीन मुलं असून ते देखील व्यवसायाने वकीलच आहेत.

पराशरण यांनी अयोध्या राम जन्मभूमी विवाद प्रकरणामध्ये हिंदू पक्षांची बाजू मांडली होती. त्यामुळे त्यांना ‘देवांचे वकील’ असे संबोधण्यात येऊ लागले. खटल्याच्या बचावासाठी त्यांनी जे युक्तिवाद केले ते पाहून लोक स्तब्ध झाले होते. अयोध्या प्रकरणात त्यांनी स्कंध पुराणातील श्लोकांचा उल्लेख करून राम मंदिराचे अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न केले होते, आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील ठरले. अयोध्या जमीन विवाद चा निर्णय हिंदू पक्षाच्या बाजूने लागला.

पराशरण यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. असे असूनही ते जमिनीशी जोडलेले दिसून येतात. रामसेतूच्या खटल्यात न्यायालयात बाजू मांडताना त्यांनी म्हटले होते की, मी माझ्या रामासाठी इतके तर करूच शकतो. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संविधानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांना मसुदा आणि संपादकीय समितीत समाविष्ट केले होते. तसेच सबरीमाला प्रकरणातील भगवान अयप्पा यांची वकिली देखील त्यांनीच केली होती. पराशरण यांना भारतीय इतिहास, वेद पुराण आणि धर्माच्या बरोबरच घटनेचे देखील विस्तृत ज्ञान आहे. ते याचा वापर कोर्टात करतानाही दिसतात.

देशाच्या आपत्कालीन स्थितीच्या दरम्यान पराशरण हे तामिळनाडूचे अ‍ॅटर्नी जनरल राहिले आहेत. १९८३ ते १९८९ पर्यंत देशातील अ‍ॅटर्नी जनरल म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९२ मध्ये जेव्हा मुंबई येथील निवासी मिलन बॅनर्जी यांची अ‍ॅटर्नी जनरल म्हणून नियुक्ती केली गेली तेव्हा पराशरण यांना ‘सुपर एजी’ म्हणून संबोधले गेले होते. घटनात्मक बाबतीत सरकारजवळ पराशरण हे सर्वात उत्तम पर्याय म्हणून आहेत. सरकारे बदलली, पण पराशरण यांचे नेहमीच कौतुक होत राहिले. राम मंदिर ट्रस्टमध्ये पराशरण यांनाही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

…जेव्हा मुख्य न्यायाधीश यांनी विचारले तुम्हाला बसून वाद घालायला आवडेल काय ?

अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान एक घटना पाहण्यास मिळाली ज्यावरून भगवान राम यांच्यावर पराशरण यांच्या श्रद्धेचा अंदाज येऊ शकतो. रामललाच्या बाजूने आपला पक्ष मांडण्यासाठी पराशरण आपल्या जागेवरुन उभे राहिले असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांना विचारले, “तुम्ही बसून वाद घालू इच्छिता काय?” त्यावेळी ते म्हणाले, “काही फरक पडत नाही. उभे राहून वादविवाद करणे ही बारची परंपरा आहे.”