NRC ची यादी आज सकाळी 10 वाजता जाहीर होणार, आसाममधील 41 लाख लोकांचे भविष्य टांगणीला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) यादी येण्यापूर्वी आसाममध्ये तणाव वाढला आहे. एनआरसीच्या यादीमध्ये नाव न येण्याची शक्यता असल्याने लोक त्यांच्या भविष्याबद्दल चिंतेत आहेत. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार एनआरसीची अंतिम यादी आज ३१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जाहीर केली जाणार आहे. या यादीतून जवळपास ४१ लाख लोकांना वगळता येईल. सध्या या लोकांच्या भविष्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
NRC
एनआरसीबाबत चिंताग्रस्त असलेल्या ५५ वर्षीय अंजली दास यांनी गेल्या तीन दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही किंवा व्यवस्थित झोपलेल्याही नाहीत. अंजली दास सांगतात की पहिल्या दोन याद्यांमध्ये त्यांचे आणि कुटुंबातील सदस्यांचे नाव होते, परंतु त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे अंतिम यादीतून काढून टाकण्यात आली आहेत.

अंजली सांगते की आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत आणि आमचे नावही पहिल्या दोन याद्यांमध्ये होते, परंतु आता आमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे अचानक शेवटच्या यादीतून काढून टाकण्यात आली आहेत. आम्हाला हे लोक परदेशी म्हणतात. हे कसे शक्य आहे? आम्ही भारतीय आहोत हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. माझ्या वडिलांचे नाव आणि पत्ता सर्व येथे आहेत. या सर्व प्रकारामुळे हे कुटुंब प्रचंड तणावाखाली असल्याचे तिने सांगितले.

कारकुनी चुकांच्या बळी ठरले साधन दास :
अंजली आणि तिचे कुटुंब अनेक दशकांपासून आसाममध्ये राहत आहेत, परंतु आता तिचा पती साधन दास आणि त्यामागे सर्व कुटुंब लिपिकांच्या चुकांचा बळी ठरले आहे. पहिल्या दोन याद्यांमध्ये त्याचे नाव बदलून साधना दास करण्यात आले आणि आता अचानक त्यांचे नाव त्या यादीतून हटविण्यात आले. जेव्हा दास याचे नाव चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केले गेले, तेव्हा त्याने त्या चुका सुधारण्यासाठी दोनदा अर्ज केला, परंतु तरीही चूक सुधारली गेली नाही. साधन दास आसामच्या मोरीगावमधील बोरखळ येथील शेतकरी आणि रहिवासी आहेत.

आई-वडिलांसह मुलगा आणि मुलगी देखील चिंतेत :
साधन दास यांचा मुलगा सुनील दास आणि त्यांची मुलगी कमला दास यांनाही एनआरसीच्या यादीमध्ये नाव न येण्याची चिंता आहे. सुनील दास म्हणतात की एनआरसी यादीत नाव न येण्याच्या चिंतेमुळे, जेवणही जात नाही आणि कामही करावेसे वाटत नाही. काय करावे या विचाराने डोकेच चालत नाही. एनआरसी यादीमध्ये नाव न आल्यास काय होईल याचीच चिंता लागून राहिल्याचे ते सांगतात.

एनआरसी बाबत कमला दास म्हणाल्या, आम्ही खटला लढवून डिक्री मिळवण्यासाठी खूप पैसा खर्च केला. याकामी आम्ही आमची सर्व बचत संपवली आहे. आता आम्ही खूप दु: खी आहोत. आमचे नाव एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये राहिले नाही तर काय करावे ?

यादीत पालकांचे नाव आहे, परंतु मुलांचे नाव मात्र नाही :
अशी परिस्थिती केवळ आसामच्या एका जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आहे. आसाममधील नेली भागात काही कुटूंबाची अशी कहाणी आहे की पालकांचे नाव एनआरसी यादीमध्ये आहे, परंतु त्यांच्या मुलांचे नाव यादीतून गहाळ आहे. नसीम उल नेसा म्हणाले, माझे आणि माझे पतीचे नाव एनआरसी यादीमध्ये आहे, परंतु माझ्या चारही मुलांची नावे एनआरसी यादीमधून गायब आहेत. आता काय होईल याबद्दल काहीही माहिती नाही. मुलांनाही देश व शाळा सोडण्यास सांगितले जाईल ? यामुळे आम्ही खूप चिंतीत झालो आहोत.

तथापि, येत्या १२० दिवसांत सरकारने मूळ म्हणजे आसाममधील रहिवासी असलेल्या कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय रियाझुद्दीन म्हणाला, ‘मी एक शेतकरी आहे आणि मी मजूर म्हणून काम करतो. गेल्या काही महिन्यांत एनआरसीमधील नावासाठी सर्व काही केले. आता जर माझ्या मुलांचे नाव एनआरसीमध्ये नसेल तर आम्ही कसे जगणार ? आणि त्याशिवाय मुलांना नागरिक कसे म्हटले जाईल. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन :
दरम्यान आज ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून आसामच्या प्रशासनाने यादी जाहीर होण्यादरम्यान आणि जाहीर झाल्यानंतर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारेही शांततेचे आवाहन केले जात आहे. पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात सूचना दिल्या असून संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी तयारी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –