चीनमध्ये गोंधळ उडवणारे ‘Remove China Apps’ गुगल प्ले स्टोरने हटवले, लाखो लोकांनी केले होते इन्स्टॉल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लडाखमध्ये एलएसीवर चीनी लष्करासोबत वाढत्या वादादरम्यान देशात चीनच्या विरोधात मोठा संताप आहे. याचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की चीनी अ‍ॅप हटवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिमूव्ह चायना अ‍ॅप या अ‍ॅपला लोकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. विक्रमी 50 लाख पेक्षा जास्त लोकांनी ते डाऊनलोड केले. परंतु, आश्चर्य म्हणजे आता गुगल प्ले स्टोरने हे अ‍ॅप हटवले आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लोक आता गुगल प्ले स्टोरवर गेले असता ते हटवल्याचे दिसत आहे.

हे अ‍ॅप का हटवण्यात आले, ते भविष्यात उपलब्ध होणार किंवा नाही, याबाबत गुगल प्ले स्टोरने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. तसेच हे अ‍ॅप विकसित करणारी जयपूरची कंपनी वन टच अ‍ॅपलॅबने ट्विट करत म्हटले आहे की, अ‍ॅप प्ले स्टोरवरून हटवण्यात आले आहे. असे का करण्यात आले याबाबत कंपनीने सुद्धा काही सांगितलेले नाही. अमूमन गुगल त्याच अ‍ॅपला हटवते जे प्ले स्टोरच्या नियमांचे उल्लंघन करते किंवा युजर्ससाठी हानीकारक असते.

कंपनीने म्हटले आहे, गुगलने रिमूव्ह चायना अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवरून हटवले आहे. मागील दोन आठवड्यात तुमचे जे सहकार्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद…तुम्ही कमाल केली.

अ‍ॅप विकसित करणारी कंपनी वन टच अ‍ॅपलॅबचे म्हणणे आहे की, त्यांनी हे शैक्षणिक हेतून ते तयार केले होते, जेणेकरून कुठले अ‍ॅप कोणत्या देशाचे आहे याची माहिती मिळावी. कंपनीचा हेतू अ‍ॅपच्या व्यावसायिक वापराचा नाही. ते गुगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. हे अ‍ॅप 17 मे रोजी गुगल प्ले वर लाईव्ह झाले होते. त्यांनतर हे अ‍ॅप आतापर्यंत 50 लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपबाबत चीनमध्ये मोठी चर्चा होती. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, इंजिनियर भारतात तयार झालेल्या चीनविरोधी वातावरणाचा फायदा घेत आहेत. हे सॉफ्टवेयर भारत आणि चीनच्या संबंधाला नुकसात पोहचवत आहे.

गुगल प्ले वर या अ‍ॅपला 4.9 रेटिंगसह 1.89 लाख रिव्ह्यज मिळाले होते. मात्र, आता रिमव्ह चायना अ‍ॅप सर्वांनी आपल्या स्मार्टफोनमधून हटवले पाहिजे. कारण सध्याच्या स्थितीत ते गुगलद्वारे व्हेरिफाईड अ‍ॅप राहीलेले नाही. सध्याच्या काळात एलएसीवर चीनच्या सोबत वाद सुरू आहे. चीनसोबत सतत वाढत्या सैन्य तणावादरम्यान भारतीय हवाई दलानेसुद्धा लडाखमध्ये शत्रूला शह देणारी सुखोई आणि मिराजसारखी लढाऊ विमाने तैनात केली आहेत. तसेच भारतीयांमध्ये चीनच्या या वर्तणूकीबाबत कमालीचा संताप आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like