भाजपात प्रवेश केल्यानंतर डान्सर सपना चौधरीचे खासदार मनोज तिवारींबद्दल ‘मोठं’ वक्तव्य !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – डान्सर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या सपना चौधरीने आता राजकारणात पाऊल टाकले आहे. रविवारी (दि 7 जुलै) भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी म्हणाली की, “देशा प्रति भाजपाची भावना पाहून मी पार्टीत सामिल झाले आहे. सध्या तरी मी निवडणूक लढवणार नाही. परंतु कार्यकर्ता म्हणून माझ्या पात्रतेप्रमाणे प्रचार-प्रसाराचे जे पण काम मिळेल ते मी सैनिकाप्रमाणे पार पाडेल.”

रविवारी मथुरेतील एका कार्यक्रमामध्ये सपना चौधरीने पत्रकाराशी बोलताना सांगितले की, तिच्यावर कोणाचाही दबाव नव्हता. दिल्लीचे भाजपा प्रदेश प्रभारी मनोज तिवारी तिच्यावर मुलीसारखं प्रेम करतात, त्यांची प्रेरणा आज कामाला आली आहे.

image.png

मनोज तिवारी माझे चांगले मित्र आहे म्हणून…

लोकसभा निवडणुकीदरम्यान सपना चौधरीने 22 एप्रिल रोजी मनोज तिवारीसोबत रोड शो केला होता. या रोड शो मध्ये प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरीने मनोज तिवारींसाठी मतंही मागितली होती. रोड शोमध्ये भाग घेतल्यानतंर प्रतिक्रिया देताना सपना चौधरी म्हणाली की, “अद्याप मी भाजपाचे सदस्यत्व घेतले नाही. मनोज तिवारी माझे चांगले मित्र आहे म्हणून रोड शो मध्ये सामिल झाले आहे. ”

काँग्रेसला ‘नो’ म्हटल्यानंतर मनोज तिवारींना भेटली सपना चौधरी

याचवर्षी मार्चमध्ये सपना चौधरीच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनेक बातम्या मीडियात आल्या होत्या. सपना चौधरीने काँग्रेसमध्ये सामिल होण्यापासून नकार दिल्यानंतर सपनाने मनोज तिवारी यांची भेट घेतली होती. ही भेट रात्री उशीरा मनोज तिवारी यांच्या घरी झाली होती. दोघांनी सोबत डिनरही केलं होतं. मनोज तिवारी यांचे सल्लागार नीलकांत बक्शी यांनी या भेटीला दुजोरा दिला होता. त्यानंतरच सपना चौधरीच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी सपना चौधरी म्हणाली होती की, “मनोज तिवारी चांगले कलाकार आहेत त्यामुळे त्यांना भेटत असते.”

सेक्सलाईफमध्ये आनंद मिळवण्यासाठी घ्या ‘हा’ आहार

उपचाराबाबत निष्काळजीपणा केला तर ‘डॉक्टरांवर’ होणार कारवाई

डायबिटीज, सर्दी, ताप, कावीळ या आजारांवर भेंडी आहे गुणकारी

औषध न घेताही नियंत्रणात ठेवू शकता कोलेस्टेरॉल, हे आहेत ५ उपाय

केवळ पौष्टिकच नाही तर औषधीही आहे ‘उडीद डाळ’ ; जाणून घ्या फायदे