निरपराध नागरिकांची हत्या बंद करा आणि लुटणाऱ्यांची हत्या करा : राज्यपाल सत्यपाल मलिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दहशतवाद्यांना आवाहन करताना म्हटले कि, सुरक्षा जवान आणि निरपराध नागरिकांना निशाणा करण्याऐवजी ज्यांनी हजारो वर्ष काश्मीरची संपत्ती लुटली आहे त्यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे सत्यपाल मलिक यांच्या या वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा वाद होऊ शकतो.

लडाखमधील ख्री सुल्तान च्या स्पोर्ट्स स्टेडियममध्ये कारगिल लडाख पर्यटन महोत्सव २०१९ च्या उदघाटन समारंभात बोलताना ते म्हणाले कि, ज्या मुलांनी हत्यार हाती घेतले आहे ते आपल्याच लोकांची हत्या करत आहेत. खासगी सुरक्षा अधिकारी आणि विशेष पोलीस आधिकऱ्यांची ते हत्या करत आहेत. त्यांची हत्या का करत आहेत ? ज्या लोकांनी काश्मीरची संपत्ती लुटली आहे त्यांना मारा. त्याचबरोबर त्यांनी हे देखील म्हटले कि, हत्या हा काही मार्ग असू शकत नाही. त्याचबरोबर त्यानी श्रीलंकेतील लिट्टेचे देखील उदाहरण दिले.

दरम्यान, त्यांनी या दहशतवाद्यांना इशारा देताना म्हटले कि, भारत सरकार तुमच्यापुढे गुडघे टेकणार नाही. त्याचबरोबर त्यांनी या लोकांना हत्यारे सोडण्याचे आवाहन केले. तसेच प्रमुख नेत्यांवर टीका करताना त्यांनी म्हटले कि, हे नेते दिल्लीत वेगळी भाषा बोलतात आणि काश्मीरमध्ये येऊन वेगळी.

आरोग्यविषयक वृत्त –