Covid-19 Vaccine : भारतात ‘कोरोना’ वॅक्सीनचं दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ट्रायल सुरू, ‘या’ 17 सेंटरमध्ये होणार 1600 जणांवर परीक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय फर्मास्यूटिकल कंपनी सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने कोरोना वॅक्सीनचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात ट्रायल सुरू केले आहे. ड्रग्स कंट्रोलर ऑफ इंडिया कडून परवानगी मिळाल्यानंतर कंपनीने दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वॅक्सीनचे ट्रायल सुरु केले आहे. हा ट्रायल 1600 जणांवर केला जाणार आहे.

देशातील 17 ठिकाणी हा ट्रायल होणार आहे. यामध्ये आंध्र मेडिकल कॉलेज, जेएसएस अकॅडेमी ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च, सेठ जीएस मेडिकल कॉलेज केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल (पुणे) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (जोधपुर), राजेंद्र मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल (पटणा), इंस्टीट्यूट ऑफ कम्युनिटी मेडिसीन मद्रास, भारती विद्यापीठ (पुणे), जहांगीर हॉस्पिटल (पुणे), एम्स (दिल्ली), आईसीएमआर (गोरखपूर), टीएन मेडिकल कॉलेज (मुंबई), महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था (सेवाग्राम), गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज (नागपूर) यांचा यामध्ये समावेश आहे.

ट्रायल मध्ये सहभागी असणाऱ्या एकूण 1600 योग्य सहभागी पैकी 400 सहभागी ईम्युनोजेनेसीटी कोहोर्ट चा भाग असणार आहेत. या विषयावर बोलण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, निती आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल उपस्थित होते.

यावेळी डॉ पॉल म्हणाले, देशात सध्या तीन कोरोना लसीवर काम सुरू आहे. यापैकी एक लसीचा तिसरा टप्पा आज सुरू होणार आहे. त्यांनी या लसीच्या नावाचा खुलासा करणे टाळले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट ला याबद्दल लाल किल्ल्यावर बोलताना माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की हे तीन वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. देशात सध्या तीन वॅक्सीन भारत बायोटिक- ICMR ची कोवॅक्सीन, ऑक्सफर्ड इन्स्टरजेनेका असावं ट्रायल सुरू आहेत.