CAA विरोधातील आंदोलनाबाबत धक्कादायक खुलासा ! दंगा करण्यासाठी खर्च केले गेले तब्बल 120 कोटी रूपये ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व सुधारणा कायदा पारित झाल्यानंतर देशात वातावरण तापले आहे. या कायद्याच्या विरोधात देशातील विविध राज्यात आंदोलन काढण्यात येत आहेत. आता प्रश्न उपस्थित झाला आहे की यात घडणाऱ्या हिंसेमागे कोणाचा हात आहे. या तपासात असे काही उघड झाले की ज्याने सर्वांना धक्का बसेल. सूत्रांच्या मते हिंसा, जाळपोळ, तोडफोड, धरणं यात सर्वामागे पीएफआयचा हात आहे. तपासात उघड झाले की या हिंसाचारात तब्बल 120 कोटी रुपयांचा खर्च झाला. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात जे काही हिंसात्मक प्रकार घडले त्याचा खुलासा आता होण्यास सुरुवात झाली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा होण्यास सुरुवात झाली आहे. यामागे असे जाळे आहे, जे आंदोलनकर्तापर्यंत थेट पैसे पोहचवत होते. दिल्ली, लखनऊ, अलीगड, शामली, मेरठ, बुलंदशहर, हापूड, बिजनोर, मुजरफ्फरनगर, कानपूर आणि रामपूरमध्ये किंवा देशाच्या इतर भागात जे काही घडत होते त्याचा खुलासा पोलीस तपासाच्या अहवालात उघड झाला आहे.

उत्तर प्रदेशात हिंसात्मक परिस्थिती निर्माण करण्यात आलेली संघटना पीएफआय, ज्याचे नाव पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि ओळख कट्टरपंथी इस्लामिक संघटना अशी आहे, त्यांच्या विरोधात पोलिसांना काही पुरावे मिळाले आहेत. आतापर्यंतच्या तपासात 73 बँक खात्यांचा तपास लागला आहे ज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावाने सुरु करण्यात आले होते. 7 खात्यांमध्ये पीएफआय संबंधित संघटना रिहॅब इंडिया फाऊंडेशनशी संबंधित आहे आणि या संघटनेत 17 विविध लोकांच्या आणि संघटनेंच्या नावे 37 बँक खाते सुरु आहेत.

या 73 बंक खात्यांच्या व्यवहारांचा तपास झाला. तेव्हा मोठा खुलासा झाला. तपास यंत्रणेणा चकमा देण्यासाठी 73 खात्यात जवळपास 120 कोटी रुपये जमा केले गेले होते. परंतु फक्त काही रक्कम शिल्लक ठेवत बाकी खाते रिकामे करण्यात आले. 73 खात्यामंधेय 120 कोटी रुपजे जमा केले होते. ही खाते तपास यंत्रणांच्या नजरेत येणार नाहीत याकडे पूर्ण लक्ष देण्यात आले आणि पैसे योग्य ठिकाणी पोहोचवण्यात आले.

4 डिसेंबर 2019 ला सीएबी संसदेत सादर करण्यात आले यानंतर पीएफआयसंबंधित 15 खात्यात कोट्यावधी रुपये जमा झाले. पैसे कोणी टाकले हे कळू नये यासाठी 5000 डिपॉजिट झाले किंवा 49,000 पर्यंत डिपॉजिट झाले. जास्तीत जास्त कॅश जमा करण्यात आली. पैसे जमा करणाऱ्यांना 50 हजार रुपयांपेक्षा कमी रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते.

अशा प्रकारे खात्यावरुन 2000 ते 5000 रुपये अशी थोडी थोडी रक्कम काढण्यास सांगण्यात आले होते. हिंसेपूर्वी आणि हिंसेनंतर विविध शहरातून दोन-दोन हजार आणि पाच-पाच हजार रुपये वेगवेगळ्या खात्यातून काढण्यात आले. कधी 80 वेळा तर कधी 90 वेळा एका दिवसात रक्कम काढण्यात येत होती.

पीएफआयच्या 15 बँक खात्यांंतून करण्यात आलेल्या व्यवहारातील तारखा समान आहेत. म्हणजे ज्या दिवशी हिंसा झाली त्यापूर्वी पीएफआयच्या खात्यातून लाखो रुपये काढण्यात आले. देशभरात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणातील पिक्चर आता स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने पीएफआयवर बंदी आणण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. पीएफआयवर दहशतवादी कारवायामध्ये सहभागी असल्याचे आरोप देखील झालेले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –