राष्ट्रीय लघुपट महोत्सव इंदापूरसाठी अभिमानाची गोष्ट : कैलास कदम

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – इंदापूर सारख्या ग्रामिण भागातील सर्वसामान्य व अत्यंत गरीब कुटुंबातील सोमनाथ जगताप सारखा तरून युवक मुंबई सारख्या ठीकाणी जाउन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतो. व इंदापूर तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेऊन इंदापूर करांची मान उंचावण्याचा प्रयत्न करणार्‍या दिग्दर्शक सोमनाथ जगताप याचा इंदापूरकरांना अभिमान वाटत असल्याचे मत इंदापूर नगरपरिषदेचे गटनेता कैलास कदम यांनी इंदापूर येथे बोलताना व्यक्त केले. कैलास कदम हे ग्रीन वुड क्रिएशन आयोजित चौथ्या राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्रशांत शिताप, योगेश गुंडेकर, सागर सुर्यवंशी, दशरथ भोंग, प्रशांत उंबरे इ. उपस्थित होते.

इंदापूर येथील ग्रीन वूड क्रिएशन मार्फत नुकतेच इंदापूर येथील केशर चित्रपटगृहात चौथ्यांदा राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्र, पंश्चीम बंगाल, मध्यप्रदेश, ओरिसा, दिल्ली, कोलकत्ता, बँगलोर, तेलंगणा, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक इ. राज्यातून १६१ लघुपटांनी सहभाग घेतला होता यापैकी कोल्हापूर येथील ‘देशी’ व केरळ मधील ‘कनलवाझीये’ या लघुपटांने प्रथम पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांक “कावळा उड आणि दोन जगातला कवी”, तृतीय क्रमांक ” कुकली ” या लघुपटांना मिळाला.

सर्वोकृष्ट दिग्दर्शक शहिर शा (रिकगनेशन), सर्वोकृष्ट पटकथा आशुतोस जरे (कावळा उड), सर्वोत्कृष्ट छायचित्रन गिरीष जांभळीकर ( फ्रेशनर), सर्वोकृष्ट कथा रामेश्वर झिंर्जुडे (सलाईन), सर्वोकृष्ट अभिनेता संजय ठाकूर (दोन जगातला कवी), सर्वोकृष्ट संकलन शांतारूबन गनशेकरण (ग्रे), सर्वोकृष्ट कला दिग्दर्शक सुनील कदम व नागेश नाईक (राजा), सर्वोकृष्ट अभिनेत्री केतकी नारायण (नो गो), सर्वोकृष्ट बालकलाकार आर्यन पाटील (चित्रकार) आणि प्रांजल सुरडकर (सुंद्री), सर्वोकृष्ट ज्युरी अॅवार्ड ” मिस युज व सुंद्री ” यांना देण्यात आले. बक्षिस वितरणासाठी मी मराठी चॅनेलचे एमडी अनिल कडाळे, व तुझ्यात जीव रंगला कलाकार राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांचे वडिल महेश जोशी उपस्थित होते. सुत्रसंचलन जाधव सर यांनी केले कार्यक्रमासाठी पिनू जगताप, सौरभ वाघमारे, दादा महाजन, केदार वाघमारे, दत्ता पांडे, प्रशांत गाडेकर यांनी प्रयत्न केले.