National Skill Development Corporation (NSDC) | नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पुणे : National Skill Development Corporation (NSDC) | देशातील उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगार मेळाव्याचे 11 एप्रिलपासून आयोजन करण्यात आलेले आहे.
या मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे १० हजार आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी उपलब्ध होणे अपेक्षित असून तांत्रिक, व्यावसायिक उत्कृष्ट कौशल्य आदी कुशलज्ञान असलेल्या आयटीआय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषि, पशुविज्ञान, फार्मसी, पदवी, पदविकाधारक, व्यावसायिक पात्रता याशिवाय माहिती तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल लॉजिस्टिक कॅपिटल गुड्स, सेवा आदी क्षेत्रातील कामाचा अनुभव असणारे व विदेशात आपल्या कौशल्याच्या आधारे करिअर करू इच्छिणारे उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत.
या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/Candidate-Registration या संकेतस्थळावर आणि उद्योजकांच्या सहभागाकरिता https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/ineternational/company या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
पुणे जिल्ह्यातील (Pune District) अधिकाधिक उमेदवारांनी व उद्योजकांनी या आंतरराष्ट्रीय मेळाव्यामध्ये
सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता पुणे सहायक आयुक्त सा.बा.मोहिते
(Pune Assistant Commissioner S.B.Mohite) यांनी केले आहे.
Web Title : National Skill Development Corporation (NSDC) | Organized 1st International Employment Fair by National Skill Development Corporation
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी
Chandrakant Patil | ‘किती हा ढोंगीपणा?’, चंद्रकांत पाटलांच्या मतदारसंघात फ्लेक्सबाजी