Coronavirus : देशातील 14 राज्यांमध्ये 2 दिवसात तबलिगी जमातींशी संबंधित 647 जण ‘कोरोना’बाधित : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आणि लॉकडाऊनसंबंधित आरोग्य आणि गृह मंत्रालयाने शुक्रवार संयुक्त पत्रकार परिषद घेतली ज्यात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, कालपासून आजपर्यंत कोरोना व्हायरसचे 336 नवे रुग्ण आढळले. एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2301 आहे तर 56 लोकांचा देशात मृत्यू झाला आहे. यातील 12 लोकांचा मृत्यू काल झाला आहे. तर बरे झालेल्यांची संख्या 157 आहे.

तबलिगी जमातमुळे 14 राज्यात पसरला कोरोना
लव अग्रवाल म्हणाले, मागील दोन दिवसात तबलिगी जमातशी संबंधित 647 कोविड – 19 ची प्रकरण समोर आली आहेत. यामुळे14 राज्यात उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, आसाम, दिल्ली, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तराखंडचा समावेश आहे. लव अग्रवाल म्हणाले आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना आवाहन केले आहे की डॉक्टरांना सहकार्य करा, त्यांनी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह झालेल्या गैरवर्तनाबाबत चिंता व्यक्त केली.

गृहमंत्रालयाने सुरु केले आणखी दोन टोल फ्री नंबर
गृह मंत्रालयचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाले, केंद्रीय गृह मंत्रालयाने आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्या प्रकरणी कठोर कारवाई करणे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. ते म्हणाले केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षेत 7 हेल्पालाइन नंबर ठेवण्यात आले आहेत आता आम्ही दोन हेल्पलाइन नंबर सुरु करत आहोत. जे 1930 (अखिल भारतीय टोल फ्री नंबर) आणि 1944 (पूर्वीय राज्यासाठी) असे आहेत. ICMR ने सांगितले की मागील 24 तासात कोविड – 19 च्या 8000 नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.