Solar eclipse or Surya grahan 2020 : सूर्यग्रहणाचा सूतक काळ सुरू होणार आज शनिवारी रात्री 9.15 वाजता, जाणून घ्या 7 नियम

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उद्या रविवार 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. याच दिवशी आषाढी अमावस्येला वलयाकार सूर्यग्रहण लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 21 जूनला सूर्यग्रहण दिवसा 9:16 वाजता सुरू होईल. तर स्पर्श दुपारी 12:10 वाजता होईल. मोक्ष दुपारी 3:04 वाजता होईल. या ग्रहाणाचा सूतक काळ आज 20 जून शनिवारी रात्री 9:15 वाजता सुरू होईल. ज्योतिषतज्ज्ञांनुसार ग्रहणाच्या 12 तास आधी आणि 12 तास नंतरचा काळ सूतककाळ मानला जातो.

यास कंकणाकृती ग्रहणसुद्धा म्हणतात. हे सूर्यग्रहण देशाच्या काही भागातून पूर्णपणे दिसणार आहे. हे सूर्य ग्रहण 2020 चे पहिले सूर्यग्रहण आहे. या मोठ्या खगोलीय घटनेला आता काही तासच शिल्लक राहीले आहेत.

सूर्यग्रहणाची स्थिती वलयाकार असणार आहे. प्रयागराजमध्ये सूर्यग्रहण 78 टक्के दिसेल. हरियाणाचे कुरुक्षेत्र, सिरसा, राजस्थानचे सुरजगढ, देहरादून आणि चमोलीमध्ये पूर्ण सूर्यग्रहण दिसेल. चंद्र आपल्या कक्षेत अंडाकार फिरत असतो. चंद्रापासून सूर्याचे अंतर जास्त झाल्याने दोघांचा आकार एकसारखा दिसतो. 21 जूनरोजी सूर्य कर्क रेषेच्या अगदी मध्यावर असेल.

1995 चा ‘तो’ अनुभव पुन्हा येईल

हे सूर्यग्रहण 1995 च्या ग्रहणाची आठवण करून देईल. त्या दिवशी पूर्ण सूर्यग्रहणामुळे दिवसाच अंधार पसरला होता. पक्षी आपल्या घरट्यात परतले होते. हवा थंड झाली होती. कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी सूर्य एखाद्या बांगडीप्रमाणे दिसतो. यासाठी त्यास कंकणाकृती ग्रहण म्हणतात. मागच्या वर्षी 1995च्या पूर्ण ग्रहणावेळी असे झाले होते.

असे दिसेल ग्रहण

ज्योतिषशास्त्रानुसार 21 जूनला सूर्य वलयावर चंद्राचा पूर्ण आकार दिसेल. सूर्याच्या केंद्राचा पूर्ण भाग काळा दिसेल, तर किनार्‍यावर चमक दिसेल. अशाप्रकारे सूर्यग्रहण संपर्ण जगातून दिसेल. मात्र, बहुतांश ठिकाणी ते आंशिक दिसेल. जेव्हा सूर्यग्रहण असते, दोन चंद्रग्रहणांसोबत असते. यामध्ये एक तर दोन चंद्रग्रहण याच्या अगोदर होतात किंवा एक चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या आधी आणि दुसरे सूर्यग्रहणांनतर दिसते. यावेळीही असेच होत आहे.

ज्योतिष तज्ज्ञांनुसार करावे या नियमांचे पालन

1 ज्योतिषतज्ज्ञांच्या मते सूतकामुळे सूर्यग्रहण लागण्यापूर्वी 12 तास आधी भोजन करावे.

2 वृद्ध, मुले, रूग्ण आणि गरोदर महिला दिड प्रहर चार तास अगोदर खाऊ शकतात.

3 ग्रहणानंतर नवीन जेवण बनवले पाहिजे.

4 शक्य असेल तर ग्रहणानंतर घरात ठेवलेले सर्व पाणी बदलून टाका. कारण ग्रहण काळात पाणी दुषित होते असे म्हटले जाते.

5 ग्रहणाच्या वाईट प्रभावामुळे खाण्या-पिण्याच्या वस्तू दुषित होऊ नये म्हणून यामध्ये तसेच पाण्यात तुळशीचे पाने टाकावीत.

6 ग्रहणाच्या काळात परिधान केलेले कपडे अशुद्ध समजले जातात. ग्रहण पूर्ण होताच कपड्यांसह स्नान करावे.

7 ग्रहणाच्या 30 मिनिट आधी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावे.