‘क्रीडा’ पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर पैशांचा ‘पाऊस’, बक्षिसाच्या रक्कमेत तब्बल तिप्पटीपर्यंत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील खेळात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मानित केलं. कोरोनामुळे या समारंभाचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये अनेक खेळाडू सहभागी झाले. या वर्षी 74 खेळाडूंची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती, त्यापैकी पाच जणांना खेल रत्न आणि 27 जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यापैकी 60 खेळाडूंनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या 11 केंद्रांमधून व्हर्चुअल समारंभात सहभाग घेतला.

क्रिकेटर रोहित शर्मा (खेल रत्न) आणि रोहित शर्मा (अर्जुन पुरस्कार) या कार्यक्रमात सहभागी होऊ शकले नाहीत कारण ते इंडियन प्रीमियर लीगसाठी अरब अमिरातीमध्ये आहेत. तसेच कुस्तीपट्टू विनेश फोगाट (खेल रत्न) आणि बॅडमिंटनपट्टू सात्विक साइराज (अर्जुन पुरस्कार) कोरोना पॉजिटिव्ह आढळले त्यामुळे त्यांना कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही.

पुरस्काराच्या रकमेत तीन पट वाढ

या वर्षी क्रीडा पुरस्काराच्या रकमेत तीन पट वाढ करण्यात आली आहे. सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची रक्कम 70% नी वाढवण्यात आली आहे. म्हणजे ज्या सर्वोच्च पुरस्कारासाठी 7.5 लाख रुपये देण्यात येत होते, त्यांना यावेळी 25 लाख रुपये देण्यात आले. अर्जुन पुरस्काराच्या रकमेत देखील तीन पट वाढ करण्यात आली आहे. आत्तापर्यंत या पुरस्कारासाठी 5 लाख रुपये देण्यात येत होते, त्यांना आता 15 लाख रुपये देण्यात आले. क्रीडा दिनाच्या दिवशी मंत्री किरण रिजिजू यांनी ही घोषणा केली. एवढंच नाही तर, ध्यानचंद आणि द्रोणाचार्य या पुरस्कारांची रक्कम देखील वाढवण्यात आली आहे. आत्तापर्यंत या पुरस्कारासाठी 5 लाख रुपये देण्यात येत होते, त्यांना आता 15 लाख रुपये देण्यात आले. दोन्हीच्या नियमित कॅटेगरीच्या विजेत्यांना 5 लाखांऐवजी आता 10 लाख रुपये मिळणार आहेत.