Lockdown : खाकीवर पुन्हा हल्ला ! सामूहिक नमाज पठण करणांऱ्यांचा पोलिसांवर हल्ला (व्हिडिओ)

बेंगलुरू :  वृत्तसंस्था –  कर्नाटकच्या हुबळी शहरात शुक्रवारी एका मशिदीत सामूहिक नमाज पठण करण्यास नकार दिल्याने लोकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना हुबळी शहरातील मंतूर परिसरातील मशिदीजवळ घडली. या घटनेनंतर हुबळीचे पोलीस आयुक्त आर. दिलीप यांनी सांगितले की, दोषींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.
विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील सर्व प्रमुख तीर्थक्षेत्र बंद आहेत. लोकांनी मंदिर, मशिद आणि चर्चमध्ये एकत्रिपणे न येता आपल्या घरीत प्रार्थना, नमाज पठण करावे असा सल्ला देण्यात आला आहे. असे असतानाही अजूनही काही लोक लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत.

उत्तर प्रदेशात पोलिसांवर हल्ला

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लॉकडाऊन दरम्यान शुक्रवारी घराच्या छतावर सामूहिक नमाज पठण करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन सोशल डिस्टंसिंगबाबत सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी आलेल्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये पोलीस चौकी प्रभारी, शिपायासह चार पोलीस जखमी झाले आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यातून अधिक पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आणि प्रकरण नियंत्रणात आणण्यात आले. सदर कोतवाली परिरातील कागजियाल मोहल्ला येथील साबिरच्या घराच्या छतावर 25-30 जण नमाज आदा करण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते.