home page top 1

हवाईदलाच्या महत्वपूर्ण मोहिमांमधून वगळले जाऊ शकते ‘AN ३२’ विमान हवाईदलाचे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तीन जूनला भारतीय हवाईदलाचे AN ३२ विमान दुर्घटना ग्रस्त झाले होते. ही दुर्घटना झाल्यानंतर आता दुर्गम भागात या विमानाचा वापर कमी करण्याचा विचार हवाईदलाकडून केला जातोय. अरुणाचलप्रदेशमध्ये AN ३२ विमानाच्या झालेल्या दुर्घटनेत १३ लोकांचा मृत्यू झाला होता. गेल्या १० वर्षांमध्ये रशियन विमानाच्या अपघाताची हि तिसरी घटना आहे.

हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वायुसेनेत सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे हे AN ३२ विमान सुरक्षेच्या कारणास्तव पर्वतीय आणि समुद्रीय क्षेत्रात प्रवास करण्यापासून रोखले जाऊ शकते.

भारतीय वायुसेनेच्या आधुनिकीकरणाविषयी माहिती असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, जास्तीजास्त काम C २९५ मिडीयम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट वापरून केले जाईल असे प्रयत्न केले जातील. हि विमाने आपण विकत घेणार आहोत.

अजून एका अधिकाऱ्याने सांगितले की, संरक्षण मंत्रालयाने २६ सी २९५ विमानासाठी एयरबस ची सुविधा असणार आहे. पण या विमानाची खरेदी करण्याचा हेतू हा एवरो ७४८ करियर विमानाला रिप्लेस करणे हा आहे.

Loading...
You might also like