आजच्याच दिवशी 1950 मध्ये अस्तित्वात आले होते ‘सर्वोच्च न्यायालय’, पहिल्यांदा बसले होते खंडपीठ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. सन 1950 मध्ये आजच्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने काम सुरू केले होते. 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले होते. आजच्याच दिवशी न्यायाचे सर्वात मोठे मंदिर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court of India) अस्तित्त्वात आले. या दिवशी प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे पहिले खंडपीठ बसले होते. आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी अ‍ॅटर्नी जनरलशी बोलताना या ऐतिहासिक दिवसाची आठवण काढली.

आजच्याच दिवशी 28 जानेवारी 1950 रोजी संसद भवनाच्या ‘चेंबर ऑफ प्रिसेस’ मध्ये पहिल्यांदा एससी (SC) ची बेंच बसली होती. त्याआधी फेडरल कोर्ट ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी न्यायिक संस्था होती. सन 1937 मध्ये स्थापन झालेल्या फेडरल कोर्ट ऑफ इंडियाला आजच्याच दिवशी भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) केले गेले.

काम कधी आणि केव्हा सुरू झाले?
सर्वोच्च न्यायालय अस्तित्त्वात येण्यापूर्वी फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे कामकाज संसद भवनाच्या चेंबर ऑफ प्रिसेसमध्ये केले जात होते. जेव्हा सर्वोच्च न्यायालय अस्तित्वात आले तेव्हा त्याचे उद्घाटन या ठिकाणीच झाले आणि बर्‍याच वर्षांपर्यंत येथूनच कामकाज चालू राहिले. अस्तित्वात आल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाने काम करण्यास सुरवात केली.

सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते?
सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणजेच चीफ जस्टिस हिरालाल जे कानिया होते तर पहिल्या महिला चीफ जस्टिस बीव्ही फातिमा होत्या. बीव्ही फातिमा यांनी 1959 मध्ये चीफ जस्टिस पदाचा कार्यभार स्वीकारला होता.

सर्वोच्च न्यायालय इमारत
सन 1950 मध्ये संसद भवन परिसरात सर्वोच्च न्यायालय सुरू करण्यात आले होते. 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयाला संसद भवन परिसरातून नवी दिल्लीतील टिळक मार्गावर असलेल्या मुख्यालयात हलविण्यात आले, येथे सुप्रीम कोर्टाच्या इमारतीत 15 कोर्ट रूम आहेत.