अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्ट आज देणार निर्णय

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मार्चपासून देशभरात सुरु असलेल्या कोरोनाचा परिणाम सर्वच घटकांवर झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. या दरम्यान अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. त्यात दाखल केलेल्या याचिकेत कोरोना विषाणूची स्थिती लक्षात घेता अंतिम परीक्षा रद्द करणे आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे 6 जुलैचे परिपत्रक रद्द करण्यास आव्हान देण्यात आले आहे.

https://t.co/26DPW7jwSu