या दिवसात शरीरात झाली पाण्याची कमतरता तर जीवाचं होईल ‘बरं-वाईट’, घ्या ‘या’ 7 गोष्टींची काळजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर दुर्गम डोंगराळ भाग सोडला तर संपूर्ण देशात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. आकाशातून येणाऱ्या झळांचा रस्त्यावर अनुभव घेता येऊ शकतो. हजारो लोक अशा कडक उन्हात पायी चालत त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा भयंकर उन्हाळ्यात बाहेर पडणे हे मृत्यूचे देखील कारण ठरू शकते.

म्हणूनच हे फार महत्वाचे आहे की, जर अशात घराबाहेर पडायचे असेल तर, पूर्ण काळजी घेतली पाहिजे. या कडक उन्हाळ्यात कोणतीही व्यक्ती काहीही न खाता-पिता तीन आठवडे किंवा २१ दिवस जिवंत राहू शकते. पण पाणी न पिता अधिकाधिक ७२ तासच जिवंत राहू शकते. त्यामुळे जिवंत राहण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जाणून घेऊया या कडक उन्हाळ्यात सावध कसे राहिले पाहिजे…

जर अशा तीव्र उन्हात बाहेर पडायचे असेल तर आपले तोंड आणि हात पूर्णपणे कव्हर करूनच बाहेर जा.
पाण्याची बाटली सोबत ठेवा आणि काही अंतराने पाणी पीत राहा. पाणी न पिल्यास डी-हायड्रेशनची समस्या उद्भवेल, जी अशा उष्णतेत जीव जाण्याचे मुख्य कारण बनू शकते.

आपल्या शरीरात फक्त ६० टक्के पाणी असते, जे प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला मदत करते. परंतु उन्हाळ्यामध्ये घामाच्या स्वरूपात हे पाणी झपाट्याने बाहेर पडते. ही कमी पूर्ण करण्यासाठी सतत पाणी पिणे आवश्यक आहे. हे आपल्याला थंडच ठेवत नाही तर ऊर्जा देखील देते.

शरीराचे काही भाग जसे तोंड, हात पाण्याने ओले करत राहा. हे ताजेपणा देण्यात मदत करू शकते.
शरीरात पाणी आणि अन्नाची कमतरता असल्यास त्यांची कमतरता भागवण्यासाठी काकडी, कलिंगड, खरबूज इत्यादी गोष्टी घेता येऊ शकतात. त्यांच्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि तसेच अन्नाची कमी दूर करण्यात देखील मदत होते.

अशी तीव्र उष्णता बाहेर येण्यामुळे वेगाने शरीरातील पाणी बाहेर पडते, अशात ही कमतरता त्वरीत पूर्ण करण्याची गरज असते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तर स्वतःचे मूत्र पिण्यायोग्य बनवण्यासाठी शुद्ध केले जाते.

दररोज कच्चा कांदा खा. उन्हात बाहेर पडताना एक छोटा कांदा आपल्या खिशात ठेवा, तो शरीराला उष्णता जाणवू देत नाही आणि सगळी उष्णता स्वतःच घेतो. उन्हाळ्यात मऊ, कोमल, सूती कपडे परिधान केले पाहिजेत, जेणेकरून हवा आणि कपडे शरीराचा घाम शोषत राहतील.