CoronaVirus Impct : NET, JEE परिक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखांमध्ये बदल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे. त्यात देशात होणाऱ्या अनेक परिक्षांवर देखील परिणाम झाला आहे. देशात अनेक परिक्षेसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जाच्या तारखांमध्ये वाढ करण्यात आली आहे जेणे करुन जे याआधी दिलेल्या वेळेत काही कारणाने अर्ज करु शकणार नाही, त्यांच्यासाठी ही सुविधा करुन देण्यात आली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजेन्सी (National Testing Agency) कडून नेट, जेईई, इग्नू विद्यापीठासाठीच्या पात्रता परिक्षा या परिक्षासाठी जे अर्ज भरुन घेतले जातात, त्या अर्जाच्या तारख्यांच्या कालावधी वाढ करण्यात आली आहे. या परिक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरले जातात. आता या परिक्षेंसाठी अर्ज करणाच्या तारखांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे.

जेईईसाठी अर्ज भरण्याचा जो कालावधी होता त्याची अंतिम तारीख 31-3-2020 होती ती आता 30 – 4 – 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तर नेटसाठी (NET) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 – 04 – 2020 वरुन 16 – 5 – 2020 करण्यात आली आहे. यासारख्या इतर परिक्षेच्या अर्ज करण्याच्या तारखांमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. अर्ज करण्याच्या अंतिम तारखा वाढवण्यात आल्या आहेत. यासंबंधित माहिती नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

यामुळे या परिक्षेंसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना थोडा का होईना परंतु दिलासा मिळाला आहे. असे असले तरी परिक्षेच्या तारखांमध्ये कोणते बदल करण्यात येणार आहे अथवा नाही याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

उमेदवार https://pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=200828 या वेबसाइटवर जाऊन आधिक माहिती घेऊ शकतात.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like