देशात ‘कोरोना’ तिसऱ्या टप्प्यात पोहचण्याची शक्यता वाढली, ICMR उद्या जाहीर करणार नवीन ‘गाइडलाइन’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  भारतामध्ये काही भागात कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशन म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात पोहचण्याची शक्यता वाढली आहे. खासकरून तबलगी जमातीचे लोक देशातील अनेक भागात गेल्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे. यानंतर सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन रणनिती आखण्याचा विचार सुरु केला आहे. याअंतर्गत ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट आहे त्याठिकाणी कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाण केली जाऊ शकते. यासाठी आयसीएमआर उद्या (शुक्रवारी) नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहे.

सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणत तपासणी

नव्या रणनीतीचा एक भाग म्हणून, ज्या ठिकाणी कम्युनिटी ट्रंन्समिशन होण्याची शक्यता जास्त आहे त्या परिसरात सरकारकडून घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधला जाईल. या भागामध्ये कोरोनाची लक्षण असलेल्या लोकांची तपासणी आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुमुने तपासले जाऊ शकतात. जेणेकरून त्या ठिकाणी कोरोना विषाणूचा फैलाव किती प्रमाणात झाला आहे हे समजेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोरोना विषाणूची चाचणीची मार्गदर्शक तत्वे देखील बदलण्यात येत आहेत.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, आतापर्यंत केवळ कोरोनाची लक्षण आढळून आलेल्या रुग्णांची तपासणी करण्याची परवानगी होती. मात्र, आता त्यात सूट दिली जाऊ शकते. आयसीएमआर नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करत आहे. ज्यामध्ये कोरोनाची चाचणी कोणत्या लोकांना करता येईल हे सांगण्यात येणार आहे. शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात येणार असल्याचे आयसीएमआरचे डॉक्टर रमण गंगाखेडकर यांनी सांगितले.

You might also like