‘कोरोना’च्या प्रकारांमध्ये असतो थोडा फरक, ‘लसी’संदर्भात संशोधकांनी बाहेर आणली नवीन माहिती, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोविड-19 ला कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूसंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जरी या विषाणूचे आतापर्यंत सुमारे सहा प्रकार (स्ट्रेन) समोर आले असले तरीही, या सर्व प्रकारच्या स्ट्रेनमध्ये फरक अगदी थोडा आहे. म्हणूनच, या विषाणूविरूद्ध प्रभावी औषधे किंवा लस तयार करण्यात थोडीशी सहजता येऊ शकते.

मायक्रोबायोलॉजी फ्रंटियर्स या विज्ञान जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूच्या 48,635 जीनोमच्या विश्लेषणावर आधारित हा निष्कर्ष काढला गेला आहे. इटलीच्या बोलोना विद्यापीठातील संशोधकांनी व्हायरसच्या प्रसाराचा आणि विविध देशांमध्ये होणार्‍या बदलांचा अभ्यास केला. यात आढळले आहे की व्हायरसच्या वेगवेगळ्या स्ट्रेन मध्ये फारसा फरक नाही. अगदी सामान्य प्रकारच्या फ्लूमध्येही यापेक्षा दुप्पट फरक दिसून आला आहे. संशोधक फेडरिको म्हणाले की या परिणामांमुळे अशी अपेक्षा निर्माण झाली आहे की कोरोना विषाणूविरूद्ध जे औषध किंवा लस विकसित होईल, ती याच्या सर्व प्रकारांवर परिणामकारक ठरू शकते.

जगभरात सर्वाधिक ‘जी’ स्ट्रेन पसरला आहे

आतापर्यंत या विषाणूचे सहा स्ट्रेन आढळले आहेत. त्याचा पहिला ‘एल’ स्ट्रेन डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहानमध्ये प्रथम उघडकीस आला. या वर्षाच्या जानेवारीच्या सुरुवातीस त्याचा ‘एस’ स्ट्रेन आढळला. काही दिवसांनंतर त्याचे ‘व्ही’ आणि ‘जी’ स्ट्रेन आढळले. सध्या ‘जी’ स्ट्रेन जगभर पसरलेला आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस काही ठिकाणी ‘जीआर’ आणि ‘जीएच’ स्ट्रेनची ओळख झाली होती. सध्याला जवळजवळ 74 टक्के प्रकरणे ‘जी’, ‘जीआर’ आणि ‘जीएच’ विषाणूच्या स्ट्रेनशी संबंधित आहेत.

तर दुसरीकडे, भारतात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत 52,050 रुग्ण समोर आले आहेत आणि 803 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like