अल-हिंद IS बंगळुरू मॉड्यूल प्रकरणातील आरोपीवर बक्षीस जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अल-हिंद आएस बंगळुरू मॉड्यूल प्रकरणात फरार आरोपी अब्दुल माथीन याच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास तीन लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. एका अधिकाऱ्याने सागितले की, 26 वर्षीय माथिन कर्नाटकातील शिमोगा येथील रहिवासी आहे. हे प्रकरण मेहबूब पाशा, खाजा मोदीन आणि त्याच्या साथीदारांनी आएस-प्रेरित दहशतवादी संघटना स्थापन करण्याशी आहे. तामिळनाडूमध्ये हिंदू नेत्यांच्या हत्येतही हे लोक सहभागी होते.

आतापर्यंत 12 आरोपींना अटक
2019 मध्ये पाशाने दहशतवादी हल्ल्यांचा कट रचण्यासाठी आणि अफगाणिस्तान आणि सिरियामध्ये आयएससाठी भरती करण्यासाठी बंगळूर येथील निवासस्थानी अनेक बैठका घेतल्या. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाशा, इम्रान, मुहम्मद हनीफ खान, मुहम्मद मन्सूर, अली खान, सलीम खान, हुसेन शरीफ, एजाज पाशा, जबीउल्ला, सय्यद अझमतुल्ला, सय्यद फैसल रहमान, महंमद जैद आणि सादिक बाशा यांचा समावेश आहे. यामध्ये मथिन हा सलीम आणि जैदचा मित्र होता आणि त्यातूनच त्याने अल-हिंद ट्रस्टच्या माध्यमातून पाशाशी संपर्क साधला.

2013 मध्ये इंडियन मुजाहिद्दीन मध्ये फूट
विशेष म्हणजे भारतीय प्रमुख यासीन भटकळ याला अटक झाल्यांतर 2013 मध्ये इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दोन तुकडे झाले. त्यानंतर, नवीन संघटना अल-हिंद आयएस ची स्थापना करण्यात आली. परंतु इंडियन मुजाहिद्दीनमध्ये फूट पडण्याचे मुख्य कारण म्हणजे बॉस रियाज भटकळ आणि इक्बाल भटकळ यांच्यातील इक्बालची संतप्त वृत्ती हे होते.