सावधान ! अनेक वर्ष जगू शकतो ‘कोरोना’ व्हायरस, खोकला आणि शिंकणार्‍यांपासून रहा ‘लांब’च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस चीन मधून आता आशियाच्या दुसऱ्या देशात पसरत आहे. आतापर्यंत या व्हायरसची लागण तीन लोकांना झाली असल्याचे उघड झाले आहे. या तीन घटना जपान, थायलंड आणि दक्षिण कोरिया येथे घडल्या आहेत. चीन मधून परतणाऱ्या एका ऑस्ट्रेलियाच्या व्यक्तीवर देखील उपचार चालू आहेत. या व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांनी चीनमध्ये जाणा-या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतानेही चीनमध्ये जाण्यासंबंधी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. या व्हायरसमुळे एकट्या चीनमध्ये आतापर्यंत सुमारे २२० घटना घडल्या आहेत, तर या विषाणूमुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.

वुहान मध्ये समोर आली पहिली घटना –
चीनच्या वुहान शहरात या व्हायरस ची पहिली घटना समोर आली होती. २००२ आणि २००३ या दोन वर्षांमध्ये चीन आणि हॉंगकॉंग मध्ये जवळपास ६५० लोकांचा मृत्यू झाला होता. वुहान शहरात सध्या या विषाणूमुळे तीन मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये आतापर्यंत जितक्या घटना घडल्या आहेत त्यापैकी एकट्या वुहानमध्येच १९८ घटना घडल्याचे समोर आले आहे.

माहितीचा अभाव –
विशेष म्हणजे या व्हायरस बद्दल बरीच माहिती अजून समोर आलेली नाही. यातील आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे या व्हायरसच्या प्रसाराविषयी आहे. आतापर्यंत याबाबतीत दोन गोष्टी समोर आल्या असून या व्हायरसच्या प्रसाराचा मुख्य स्रोत सीफूड मार्केट आणि प्राण्यांना मानले जात आहे. डब्ल्यूएचओने भीती व्यक्त केली आहे की याचा मुख्य स्रोत हा प्राण्यांपासून होत आहे. तसेच या व्हायरसबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस पसरतो.

भारत सरकारकडून देण्यात आला सल्ला –
कोरोना व्हायरसबद्दल भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच सल्ला जारी केला आहे. याशिवाय मंत्रालयाने लोकांनाही काही विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला फक्त चीन प्रवास करणार्‍यांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच जारी करण्यात आला आहे.

आपल्या सोबत ताजे पदार्थ ठेवावेत आणि बाहेरचे खाणे टाळावे.
हस्तांदोलन करणे टाळा, जर हात मिळवणे जरुरी असेल तर हस्तांदोलन झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.
खोकला किंवा शिंक आल्यास तोंडाला रुमाल लावा.
एखाद्या व्यक्तीची तब्येत ठीक नसेल तर अशा व्यक्तीच्या संपर्कात येण्याचे टाळा, खासकरून खोकला आणि शिंका येणाऱ्या व्यक्तींपासून विशेष काळजी घ्या.
जनावरांच्या जवळ जाण्यास टाळा, याशिवाय कच्चे मांस खाणे देखील टाळा.
– कोणत्याही प्रकारच्या पशु फार्म, जनावरांचा बाजार आणि कत्तलखान्यांना भेट देऊ नका.
घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क वापरा.
चीनला जात असलेल्या प्रवाशांनी आरोग्याची विशेष काळजी घ्या, खोकला किंवा सतत शिंका येत असतील तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपण जर अस्वस्थ असाल तर प्रवास करणे टाळा.
चीनमध्ये जाणाऱ्या कोणत्याही भारतीयास जर प्रवासादरम्यान विमानात अस्वस्थ वाटत असेल तर ताबडतोब विमानातील परिचालकास कळवा. परिचालका कडून मास्‍क देखील घ्या. अशा प्रवाशांनी प्रवासी एयरपोर्ट हैल्‍थ ऑथोरिटी आणि इमिग्रेशन डिपार्टमेंटला संपर्क करावा.
आपल्या आरोग्याबद्दल माहिती देताना कृपया आपल्या प्रवासात घडलेल्या आरोग्याबाबत समस्या डॉक्टरांना सांगा.

इथेही लक्ष द्या –
यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार Severe acute respiratory syndrome किंवा SARS हा निमोनिया चा धोकादायक प्रकार आहे. अशा वेळी श्वास घेण्यास त्रास होत असतो. कधी कधी त्यातून मृत्यू देखील होतो. खोकला आणि शिंक येणे ही या व्हायरसची ओळख आहे. खोकल्याने आणि शिंकल्याने हा व्हायरस हवेत पसरतो आणि जवळपासच्या लोकांना या व्हायरसची लागण होते. यामधील सर्वात धोकादायक गोष्ट अशी की हा व्हायरस काही महिने ते अनेक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. एवढेच नाही तर तापमान कमी झाल्याने हा व्हायरस जिवंत राहू शकतो. हा व्हायरस हवेमध्ये झपाट्याने पसरत असतो. हा व्हायरस विष्ठेमध्ये देखील सापडला आहे आणि त्या वातावरणात तो सुमारे चार दिवस जिवंत राहू शकतो. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या म्हणण्यानुसार, व्हायरसने ग्रस्त रुग्ण बरा झाल्यावरही याची लागण पुन्हा होऊ शकते. त्यानुसार या विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर दोन ते दहा दिवसानंतर त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर दिसू लागतो.

फेसबुक पेज लाईक करा –