काय सांगता ! होय, आता केंद्रीय निमलष्करी दलात ‘ट्रान्सजेंडर’चे सैनिक बनण्याचे स्वप्न होणार साकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मध्यवर्ती निमलष्करी दलांमध्ये ट्रान्सजेंडर लोकांचे सैनिक बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. सरकार या दलात अधिकारी म्हणून भरतीसाठी ट्रान्सजेंडर लोकांना यूपीएससीच्या वार्षिक परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये ट्रान्सजेंडर पर्सन (Transgender Persons Protection of Rights Act) कायदा अधिसूचित केला होता. या कायद्यांतर्गत सैनिकांच्या भूमिकेसह सर्व क्षेत्रात आणि सेवांमध्ये ट्रान्सजेंडरला समान संधी देणे आवश्यक आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाकडून पक्ष किंवा विरोधात टिप्पणी मागितली आहे, जेणेकरून लोकसेवा आयोगाला सूचित केले जाऊ शकेल कि त्यांनी यावर्षीच्या सीएपीएफच्या सहाय्यक कमांडंट परीक्षा म्हणजे एसीएस परीक्षेसाठी जारी होणाऱ्या अधिसूचनेमध्ये ट्रान्सजेंडर श्रेणी समाविष्ट करायची की नाही. सीएपीएफ अंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), बीएसएफ, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), भारत-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा दलात (एसएसबी) मध्ये सहाय्यक कमांडंटचे एक पद प्रवेश स्तरीय अधिकाऱ्याची रँक असते.

या विषयावर सीएपीएफचे वरिष्ठ कमांडर म्हणाले की, दलाने अधिकारी रँकमध्ये ट्रान्सजेंडर्सच्या आव्हानांवर आणि संधींवर चर्चा केली आहे. आम्हाला आढळले आहे की, सीएपीएफसाठी ही पायरी तशीच आहे जेव्हा काही वर्षांपूर्वी कॉन्स्टेबल आणि इतर रँकचे अधिकारी म्हणून महिलांची भरती झाली होती. ट्रान्सजेंडर दलाची संरचना मजबूत करतील. ते म्हणाले की, मला विश्वास आहे की जर एकीकृत दलाने चांगले उदाहरण मांडले नाही, तर समाजातील विविध घटक या लोकांना स्वीकारतील अशी अपेक्षा कशी करता येईल ?

ते पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात सैनिकांमध्ये स्वीकृतीचा मुद्दा असू शकतो, पण ज्या प्रकारे स्त्रियांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे, तसेच ट्रान्सजेंडर देखील करतील. तर दुसर्‍या अधिकाऱ्याने म्हटले की, आम्हाला आढळले आहे की ट्रान्सजेंडर अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज पडणार नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये अधिकारी बनण्याची क्षमता असेल, तर तो कोणत्याही लिंगाचा असला तरी त्याला सीएपीएफमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र त्यांनी हेही सांगितले की, उमेदवाराला निर्धारित वैद्यकीय, मानसिक आणि शारीरिक मापदंडांवरही यशस्वी व्हावे लागेल.