देशात 10 ऑगस्टपासून 3 दिवसांच्या संपावर असतील ट्रान्सपोर्टर्स, तुम्हाला येणार अडचणी

भोपाळ : ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस (एआय एमटीसी) ने चार मागण्यांसाठी 10 ऑगस्टपासून देशात आणि राज्यात संपाची घोषणा केली आहे. एआयएमटीसी दिल्लीचे अध्यक्ष कुलतरण सिंह आटवाल आणि राज्य वेस्ट झोन अध्यक्ष विजय कालरा यांच्यासह सर्व पदाधिकार्‍यांच्या सहमतीने चक्काजाम करून संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

एआयएमटीसीचे राज्य उपाध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की, समस्त कार्यकारिणीच्या सहमतीने सभेत निर्णय घेण्यात आला की, आमच्याकडून शासन, प्रशासनाला देण्यात आलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही समस्त ट्रान्सपोटर्स 10 ते 12 ऑगस्टपर्यंत (तीन दिवस) आपला व्यवसाय बंद करून चक्काजाम संप करणार आहोत. भोपाळसह संपूर्ण राज्यात चार ते पाच लाख ट्रक, बससह सर्व छोटे-मोठे व्यवसायिक वाहन चालवणार नाहीत.

या आहेत चार मागण्या

1 आरटीओ सीमांचे चेकपोस्ट बंद करावेत.

2 डिझलेवरील वॅट कमी करा.

3 रोड टॅक्स आणि गुड्स टॅक्समध्ये सह महिन्यांची सूट द्यावी.

4 चालकांचा कोविड विमा काढला जावा.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीने ट्रान्सपोर्ट उद्योग मोठ्या संकटात आहे. प्रवाशी आणि माल मिळत नसल्याने हजारो ट्रक, बस, टॅक्सी, टेम्पो इत्यादी चालू शकत नाहीत. अनेक ट्रान्सपोर्टरवर तर गाड्या विकण्याची पाळी आली आहे. या व्यवसायाशी जोडलेल्या हजारो लोकांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. ज्यांची नोकरी वाचली आहे, त्यांच्यावर सुद्धा टांगती तलवार आहे. रोड टॅक्ससह लोनवर घेतलेल्या गाड्यांचे ईएमआय भरण्याचे संकट आहे. प्रवासी आणि मालाची आर्डर मिळत नसल्याने सुमारे 80 टक्के गाड्या उभ्या आहेत. रोड टॅक्स देता येत नाही म्हणून अनेक लोकांनी गाड्या आरटीओ कार्यालयात सरेंडर केल्या आहेत. परंतु, रोड टॅक्स वाचवण्याचा हा लाभ ते तीन महिनेच घेऊ शकतात.

प्रयागराज बस टूर अँड ट्रॅव्हल्स वेलफेयर असोसिएशनचे अध्यक्ष संजीत जायसवाल यांचे म्हणणे आहे की, आमच्या समोर मोठे संकट आहे. सध्या तरी कसे तरी करून कर्ज वैगरे काढून काम चालवत आहोत, पण असे किती दिवस चालणार. सरकारने रोड टॅक्समध्ये सहा महिन्यांची सूट द्यावी, अशी मागणी केली आहे.