PM मोदींच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचे संक्रमण पहाता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज (सोमवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 25 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राजधानी दिल्ली येथील 7 लोक कल्याण मार्ग येथे पार पडली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टेसिंग पाळत खुर्चांची सुविधा करण्यात आली होती. कोरोना व्हयरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी म्हणून सामाजिक अंतर ठेवण्याचा संदेश या बैठकितून संपूर्ण देशाला देण्यात आला होता.

देशात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्यात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. पंतप्रधानांनी जाहीर केलेला देशातील लॉकडाऊन 14 एप्रिल रोजी संपत आहे. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, या साथीच्या रोगाची लागण होण्याची साखळी तोडणे आवश्यक आहे. आणि तज्ज्ञांच्या मते यासाठी किमान 21 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात येत आहे.