COVID-19 : HM अमित शहा यांच्यानंतर आणखी एका केंद्रीय मंत्र्यास ‘कोरोना’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे आणि बरेच व्हीव्हीआयपी त्याच्या विळख्यात सापडत आहेत. आता यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचाही समावेश झाला आहे. त्यांना मेंदाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करून त्यांनी माहिती दिली की कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर मी चाचणी केली ज्यामध्ये माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे आणि मी आता स्वस्थ आहे.

दरम्यान बऱ्याच दिग्गज नेत्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा समावेश आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like