Donald Trump at Sabarmati Ashram : साबरमती आश्रमामध्ये डोनाल्ड ट्रम्प, गांधीजींना ‘नमन’ केलं अन् चालवला ‘चरखा’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकीचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी भारत दौऱ्यांची सुरुवात अहमदाबादमधील साबरमती आश्रमातून केली आहे. साबरमती आश्रमात ट्रम्प आणि मेलानिया यांनी चरख्यावर सुत कातले आणि या दरम्यान पंतप्रधान मोदी त्यांच्या सोबत होते. ट्रम्प यांचे विमान 11.40 वाजता अहमदाबाद एअरपोर्टवर दाखल झाले.

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प कुटूंबाचे स्वागत केले आणि एअरपोर्टवरुन डोनाल्ड ट्रम्प थेट साबरमती आश्रमात पोहोचले. त्यांनी आश्रमात महात्मा गांधींना नमन केले. चीनचे राष्ट्रपती शी जिगपिंन आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे सह जगभरातील अनेक नेत्यांनी मागील काही वर्षात साबरमती आश्रमला भेट दिली. अमेरिकी अध्यक्षांच्या दौऱ्यापूर्वी स्थानिक अधिकाऱ्यांनी आश्रमाची पाहणी केली. ट्रम्प 15 मिनिट येथे असतील. परंतु हे निश्चित नव्हते की ते साबरमती आश्रमात जाणार की नाही.

साबरमती आश्रमापासून महात्मा गांधींनी भारतात अहिंसक स्वतंत्रता संग्रामास सुरुवात केली. महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तूरबा एकत्र येथे राहत असत. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला साबरमती आश्रम सुरु करण्यात आले. आश्रमात आता एक गांधी स्मारक संग्रहालय आणि एका खोलीत गांधीजींचा चरखा आणि टेबल आहे. गांधीवादी विचारधारा असलेल्यांसाठी हे आश्रम एखाद्या मंदिरापेक्षा कमी नाही.

साबरमती आश्रमानंतर ते रोड शो साठी मोटेरा स्टेडियमच्या दिशेने रवाना होतील. येथे ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ते संबोधित करतील आणि त्यानंतर ताजमहल पाहण्यासाठी जातील. त्यानंतर रात्री उशीरा दिल्लीसाठी विमानाने निघतील. दिल्लीतून ते अमेरिकेला रवाना होतील.