सर्व प्रौढांची अवयव दाता म्हणून नोंद होण्यासाठी विधेयक आणणार भाजपा खा. वरुण गांधी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भाजपा खासदार वरुण गांधी यांनी म्हटले की, सर्व प्रौढ लोकांची अवयव दाता म्हणून नोंदणी करणे बंधनकारक करण्यासंबंधी मागणी करणारे एक बिगर सरकारी विधेयक ते संसदेत सादर करणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वरूण गांधी मानवी अवयव दान आणि प्रत्यारोपण विधेयक 2020 सादर करू शकतात. लोकसभेत ते पीलीभीतचे प्रतिनिधित्व करतात.

हे विधेयक सांगते की, प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत स्वताहून या परिघाच्या बाहेर होत नाही, आपोआप अवयव दाता व्हावा. भारतात अवयवांची कमतरता आणि त्याची मागणी आणि पुरवठा यातील मोठ्या अंतराचा हवाला देत वरून यांनी म्हटले की, अवयवदान बंधनकारक करण्यासाठी मजबूत धोरण नसल्याने देशात दरवर्षी 5 लाख लोकांचा मृत्यू होतो. प्रत्येक वर्षी प्रत्यारोपणासाठी दोन लाख किडनी, 50,000 हर्ट आणि 50,000 लिव्हरची आवश्यकता असते.

या अंतरामुळे आणि अवयव उपलब्ध नसल्याने होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वरुण गांधी यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी एक प्रायव्हेट मेंबर बिल सादर करणार आहे, जे सर्व प्रौढ नागरिकांना एका राष्ट्रीय अवयवदान रजिस्टरमध्ये ठेवण्याची मागणी करते, ज्यामधून कुणीही स्वेच्छेने बाहेर होऊ शकतात. अवयव दान धोरणात बदल करण्याबाबत वरून गांधी यांनी म्हटले की, कायदेशीर प्रत्येक व्यक्ती आपोआप अवयव दाता व्हावा आणि इच्छा असल्यास त्याला बाहेर पडता यावे.