Vitamin C Side Effects : इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-C चा करा संतुलित वापर, होऊ शकतात ‘हे’ 5 साईड इफेक्ट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना महामारीपासून वाचण्यासाठी अद्याप कोणतेही परिणामकारक औषध नसल्याने आरोग्य तज्ज्ञ लोकांना आपली इम्यूनिटी वाढवण्यास सांगत आहेत. यासाठी काही लोक देशी उपाय करत आहेत, तर काही लोक व्हिटॅमिन सी चे भरपूर सेवन करत आहेत. परंतु लोकांना हे माहित नाही की व्हिटॅमिन सीच्या अतिसेवनाने साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात. व्हिटॅमिन सी जेवढे आरोग्याला चांगले आहे तेवढेच धोकादायक सुद्धा आहे. याचे कोणते साईड इफेक्ट आहेत ते जाणून घेवूयात…

1 मळमळणे
व्हिटॅमिन सी च्या गोळ्या जास्त खाल्ल्याने मळमळ किंवा जीव घाबरणे अशा समस्या होऊ शकतात. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळांचे सेवन करा.

2 अब्डॉमिनल क्रॅम्प
व्हिटॅमिन सी चे जास्त सेवन केल्याने पोटात वेदना सुद्धा होऊ शकतात. व्हिटॅमिन सी जर जास्त घेतले तर पचनक्रिया सुद्धा प्रभावित होते.

3 उलटी-अतिसार
व्हिटॅमिन सी ची गोळ्या जास्त सेवन केल्याने डायरियाची समस्या होऊ शकते. उलटी-अतिसार तसेच बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. यामुळे शरीर डीहाइड्रेटसुद्धा होऊ शकते.

4 हार्ट बर्न
व्हिटॅमिन सी च्या सर्वात घातक साईड इफेक्टमध्ये हार्ट बर्नच्या समस्येचा समावेश आहे. छातीत जळजळ झाल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जा.

5 निद्रानाश किंवा डोकेदुखी
व्हिटॅमिन सी च्या गोळ्या जास्त घेतल्याने निद्रानाश आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते. थकवा, बेचैनी वाढू शकते.

रोज केवळ इतके खा व्हिटॅमिन सी
शरीराची इम्यूनिटी वाढवण्यासाठी दररोज 65-90 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी घेतले पाहिजे. एका दिवसात 2000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त घेतलेले व्हिटॅमिन सी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. डब्ल्यूएचओ नुसार घरी तयार केलेले जेवणच सर्व आवश्यक पोषकतत्वांचे माध्यम आहे. डब्ल्यूएचओने इम्यूनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी चा दावा नाकारला आहे.