कोरोना वॉरियर्स : आईच्या मृत्यूची माहिती मिळूनही ‘ती’ काम संपविल्यानंतर गेली घरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दुर्गम भागातही लोक घराची चिंता न करता कर्तव्यामध्ये गुंतले आहेत. बेतुल जिल्ह्यातील उप-आरोग्य केंद्र असलेल्या बदलापूरमधील पहाडपूर गावात काम करणाऱ्या एका आशा कामगार राजदुलरी आईच्या मृत्यूची माहिती मिळूनही खेड्यांमध्ये काम करत राहिली आणि आपले काम संपविल्यानंतरच ती घरी गेली. एवढेच नव्हे तर गुरुवारी संध्याकाळी आईच्या अंत्यसंस्कारानंतर शुक्रवारी ती पुन्हा कामावर रुजू झाली. त्यांच्या उभा कर्तव्यदक्षतेचे विभागाने कौतुक केले असून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

अशा कामगारांना मिळाले पोस्टर लावण्याचे काम
मुख्य वैद्यकीय व अरोग्य अधिकारी डॉ.जी.सी. चौरसिया म्हणाले की, विकासखंड घोड़ाडोंगरीमध्ये आशा कार्यकर्ता राजदुलारी मलिक यांना पोस्टर लावण्याचे काम देण्यात आले आहे. त्या पहाडपूर गावात जिल्ह्याबाहेरील नागरिकांना चिन्हांकित करीत आणि त्यांच्या घरावर पिवळ्या रंगाचे पोस्टर चिकटवित आहेत. जेणेकरून स्थानिक नागरिक, शेजार्‍यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

कामादरम्यान मोबाईलवर आईच्या मृत्यूची बातमी
कामकाजादरम्यान 2 एप्रिल रोजी राजदुलारी यांना मोबाइलवर आईच्या मृत्यूची माहिती मिळाली. यानंतर दोन तासांत आपले काम संपल्यानंतर राजदुलारी घरी पोहोचल्या आणि आईचे शेवटचे दर्शन घेतले. शुक्रवारी राजदुलारी पुन्हा कामावर परतल्या. विकासखंड घोड़ाडोंगरीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीव शर्मा आणि बीसीएम घोड़ाडोंगरी प्रकाश माकोडे यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. डॉ. संजीव शर्मा यांनी प्रोत्साहन म्हणून राजदुलारी यांना एक हजार रुपयांचा धनादेश वैयक्तिकरित्या दिला.

दरम्यान, मध्य प्रदेशात आतापर्यंत 120 कोरोना संक्रमितांची नोंद आहे. त्यातील 8 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.