Weather Update : ‘कोरोना’ आणि सणांमध्ये मुसळधार पाऊस वाढवणार अडचणी, IMD चा ‘या’ भागांसाठी हाय अलर्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात सणांचे वातावरण सुरू झाले आहे. प्रथम ईद-उल अजहा नंतर रक्षाबंधन येत आहे. परंतु, या सर्वामध्ये अगोदरच त्रासदायक ठरलेल्या कोरोना व्हायरसनंतर मुसळधार पाऊस अडचणी आणखी वाढवणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. यावेळी हवामान खराब झाल्याने लोकांच्या अडचणीत भर पडू शकते. कोरोना आणि पाऊस यांना तोंड देत सणांचा आनंद कसा साजरा करायचा ही लोकांसमोर मुख्य अडचण असणार आहे.

हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. जेथे काही ठिकाणी हवामान बिघडू शकते आणि लवकरच पाऊस पडू शकतो. मात्र, मागील काही दिवसात देशाच्या विविध भागात पाऊस झाला आहे. यामुळे देशात पुढील काही दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

भारतीय हवामान विभागाने बुधवारी सांगितले की, दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळेल, शुक्रवारी येथे पाऊस होईल. आयएमडीने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद, गन्नौर, बागपत, कासगंज, नरौरा, चंदौसी, संभल, सहसवान, बदायूं, चांदपुर, अमरोहा, मुरादाबादच्या काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

सॅटेलाइट इमेजरी आणि राडार इमेजरीमध्ये मध्यम ते तीव्र हालचालीचे पॅच दिसत आहेत, जे उत्तरपश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली, पूर्वोत्तर उत्तर प्रदेश, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्किम, आसाम आणि मेघालय, किनारी आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीप क्षेत्रात आहेत.

ईद, रक्षाबंधनच्या दिवशी कसे असेल हवामान?

हवामान विभागाने अलर्ट जारी करत 1 ऑगस्टला कोंकण आणि गोवा आणि कर्नाटकच्या किनार्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पासऊ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ़, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्किम, अंदमान आणि निकोबार बेटे, मराठावाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळमध्ये विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

3 ऑगस्टला अंदमान आणि निकोबार बेटे, कोंकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनार्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार ते अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर, पूर्व उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगढ़, ओडिसा, गुजरात राज्य, आंध्र प्रदेशचा किनारी भाग आणि यनम, तेलंगना आणि केरळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.