Weather Updates : देशातील ‘या’ राज्यांमध्ये पोहचला ‘मान्सून’, मुसळधार पावसाचा ‘इशारा’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण-पश्चिम मान्सून सोमवारी गुजरातमध्ये धडकला असून मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, बिहारसह पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात पोहचला आहे. तर उत्तर भारताच्या अनेक भागात हवामान उष्ण आणि दमट आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिण पश्चिम मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्य, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगढ़, झारखंड आणि बिहारच्या उर्वरित भागात आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात पोहचला आहे. पुढील 48 तासांदरम्यान, पूर्व मध्य प्रदेशच्या काही अन्य भागात व पूर्व उत्तर प्रदेशमध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पुढे सरकारण्यास स्थिती अनुकूल आहे.

या राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज
नॉर्थ-वेस्ट राजस्थानवर तयार झालेला ईस्ट-वेस्ट ट्रफ गंगीय पश्चिम बंगालकडे सरकला आहे. या ट्रफच्या प्रभावामुळे पुढील 2-3 दिवसात महाराष्ट्रात, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ़, सिक्किम, ओडिसा, झारखंड आणि बिहारमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पुढील 2-3 दिवसात कोकण व गोवा, महाराष्ट्र्र, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिसा, बिहार आणि झारखंडच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात उद्यापासून तीन दिवस पाऊस
उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात काही ठिकाणी सोमवारी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने सांगितले, राज्याच्या काही भागात वादळासह पाऊस पडला. काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. 16 जूनला 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही भागात पाऊस सुद्धा होऊ शकतो. पश्चिम उत्तर प्रदेशात काही ठिकाणी, तर पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक ठिकाणी 17 आणि 18 जूनरोजी पाऊसाची शक्यता आहे.

बिहारमध्ये मान्सूनची चाहूल
बिहारमध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे. याबरोबरच बिहारचे हवामान बदलले आहे. येथे आता दुपारी उष्णता नव्हे, तर अल्हादायक वातावरण दिसून येत आहे. येथे उन्हाऐवजी आकाशात ढग पसरलेले दिसत आहेत. यासोबतच बिहारच्या अनेक शहरात पाऊस सुद्धा पडला आहे. हवामान विभागानुसार संपूर्ण बिहारला साऊथ वेस्ट मान्सूनने कव्हर केले आहे. पुढील काही दिवसात गया जिल्हा आणि अन्य शहरात तुरळक पाऊस होऊ शकतो. 18 जूनरोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तो संपूर्ण बिहारमध्ये पडू शकतो. जर, यापूर्वी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे.

ओडिसामध्ये पुढील तीन दिवसांपर्यंत पाऊस
तर, भुवनेश्वरमध्ये हवामान शास्त्र केंद्राचे संचालक एच.आर. बिश्वास यांनी सांगितले की, ओडिसाच्या अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवसात हलका ते जोरदार पाऊस होईल. 19 रोजी कमी दाबाचा पट्टा नॉर्थ बंगालच्या खाडीत तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्तर ओडिसात पाऊस जास्त होईल, तर साऊथ ओडिसात कमी असेल.

दिल्लीत केव्हा होऊ शकतो पाऊस
हवामान विभागानुसार, सोमवारी कमाल तापमान 41 डिग्री आणि किमान तापमान 28 डिग्री राहण्याची शक्यता आहे. यानंतर सुद्धा पुढील तीन दिवसांपर्यंत तापमान 41 आणि 40 डिग्रीच राहील. 19 जूनपासून वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होईल, ज्यामुळे वादळ आणि पावसाची शक्यता आहे. हलका पाऊस होईल. यामुळे तापमान 40 डिग्रीच्या खाली येईल.

बंगालला पावसाने व्यापले, गुरुवारपासून वाढणार पाऊस
बंगालला मान्सूनने पूर्णपणे व्यापले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, सर्व राज्यांत गुरुवारपासून पाऊस वाढणार आहे. पुढील काही दिवसात उत्तर बंगालमध्ये जोरदार पाऊसाची शक्यता आहे. दक्षिण बंगालच्या पश्चिम जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्यात सुमारे सर्व जिल्ह्यात हलका ते जोरदार पाऊस होत राहील आणि काळे ढग आकाशात दिसतील. सोमवारी कोलकातामध्ये गडगडाटासह पाऊस झाला. सकाळी कोलकाताचे किमान तापमान 26 डिग्री सेल्सियस होते, जे सामान्यपेक्षा एक डिग्री कमी आहे.

आतापर्यंत कुठपर्यंत पोहचला मान्सून
दक्षिण-पश्चिम मान्सूनने रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. यासोबतच तो गुजरात आणि छत्तीसगढच्या काही भागातही पोहचला आहे. रविवारी हवामान विभागाला मान्सून थोडा मंदावल्याचे दिसून आले होते. हवामान विभागाने सांगितले की, मान्सून पश्चिम आणि मध्य भारताच्या अधिकांश भागात पोचहला आहे, परंतु या आठवड्यात त्याची प्रगती काहीशी मंद राहण्याची शक्यता आहे.

थोडा मंदावणार मान्सून
विभागाने आपल्या वक्तव्यात म्हटले की, उत्तर अरबी समुद्र, गुजरात आणि मध्य प्रदेशासह छत्तीसगढच्या अन्य भागात, झारखंड, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढील 48 तासात दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या विस्तारासाठी स्थिती अनुकूल होत आहे. विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी म्हटले, यानंतर, एक आठवडा मान्सूनची प्रगती थोडी मंदावलेली राहील.