कधी नष्ट होणार ‘कोरोना’ ? समोर आली UP, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात अन् राजस्थानमध्ये ‘व्हायरस’ नष्ट होण्याची संभाव्य तारीख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – करोना विषाणूचा कहर कायम आहे आणि प्रत्येकजण विचारत आहे की मानवाच्या सर्वात मोठ्या शत्रूपासून कधी मुक्तता होईल ? भारतातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, राजस्थान यासह अनेक राज्यांत कोरोना विषाणू नष्ट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी SEIR आणि हायब्रीड सारख्या मॉडेल्सची मदत घेतली जात आहे. या मॉडेल्समध्ये संबंधित राज्यातील ताज्या घटनांची माहिती, मृत्यूची संख्या आणि रुग्णांचे आरोग्यांचे आकडे घेतले जातात. हे एक प्रकारचे गणित असून यामध्ये रोगाच्या समाप्तीची संभाव्य तारीख शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, भारता प्रवासी मजूरांच्या परिस्थितीमुळे हे गणित गुंतागुंतीचे बनले आहे.

21 मेच्या आकडेवारीनुसार कोरोना कधी संपेल, जाणून घ्या
21 मे पर्यंत भारतात कोरोनाचे 1.13 लाख प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी 63 हजार पेक्षा अधिक सक्रिय आहे. मृतांची संख्या 3445 आहे. तर 39 हजार पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये जवळपास 1400 जणांच्या मृत्यू सह महाराष्ट्र सगळ्यात प्रभावी राज्य ठरले आहे. एका अहवालाच्या अंदाजानुसार, SEIR मॉडेलनुसार महाराष्ट्रात 23 ऑगस्ट पर्यंत आणि हायब्रिड मॉडलच्या अहवालानुसार 29 जुलैपर्यंत हा साथीचा रोग समाप्त झाला पाहिजे. मुंबईत SEIR मॉडेलनुसार, कोरोना विषाणू 25 ऑगस्ट आणि हायब्रिड मॉडेलनुसार 5 जुलै पर्यंत राहिल.

तामिळनाडूमध्ये SEIR मॉडेलनुसार 11 ऑगस्ट आणि हायब्रिड मॉडेलनुसार 31 जुलै पर्यंत कोरोना विषाणू राहील अशी शक्यता आहे. दिल्लीत SEIR मॉडेलनुसार 15 ऑगस्ट आणि हायब्रिड मॉडेल नुसार 30 जुलैपर्यंत साथीचा रोग राहू शकतो.

उत्तर प्रदेशात SEIR मॉडेलची अपेक्षित अंतिम तारीख 19 ऑगस्ट आहे आणि हायब्रिड मॉडेलनुसार कोरोना विषाणू 30 जून रोजी संपेल. गुजरातमध्ये SEIR मॉडेलनुसार 18 ऑगस्ट आणि हायब्रिड मॉडेलनुसार 8 जुलै कोरोना विषाणू नष्ट होईल.

पश्चिम बंगालमध्ये SEIR मॉडेलनुसार अंदाजे शेवटची तारीख 18 ऑगस्ट आणि हायब्रिड मॉडेलनुसार 27 जुलै आहे. राजस्थानमध्ये SEIR मॉडेलची अंदाजे अंतिम तारीख 11 ऑगस्ट आणि हायब्रीड मॉडेलची अंदाजे तारीख 26 जुलै आहे.

चेन्नईमध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण हे 12 जुलै किंवा 31 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे संपुष्टात येऊ शकते. तर अहमदाबादमध्ये SEIR मॉडेलनुसार 26 ऑगस्ट आणि हायब्रीड मॉडेलनुसार 30 जून रोजी कोरोना विषाणूचे संक्रमण संपुष्टात येईल.