यंदा पडणार कडाक्याची थंडी, हिवाळा असेल मोठा, जाणून घ्या कधीपासून होईल सूरूवात

देशाच्या उत्तर क्षेत्रातील पर्वतीय आणि मैदानी भागात पावसाचा समारोप आणि हिवाळ्या (Winter)च्या सुरूवातीचे संकेत मिळू लागले आहेत. आगामी हिवाळ्या(Winter)च्या हंगामात कडाक्याची थंडी पडेल, तसेच हिवाळ्या(Winter)चा हंगाम मोठा असेल असा अंदाज आहे. हवेतील कमी होणारी आर्द्रता, कोरडे वेगवान वारे आणि स्वच्छ होणारे आकाश, थंडीच्या आगमनाचे संकेत देत आहे.

पाऊस थांबल्यानंतर आकाशातील ढग गायब झाले आहेत. दिवसा कडक उन पडत असल्याने दमटपणा कमी होत आहे. तर रात्री तापमान घसरण्याकडे कल आहे. हिवाळ्याच्या हंगामाचे हेच संकेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 ऑक्टोबरपासून तापमान कमी होऊ लागेल, ज्यानंतर हिवाळ्याची औपचारिक सुरूवात होईल.

हिवाळा असेल मोठा
वरिष्ठ हवामान शास्त्रत्र जीपी शर्मा यांचे म्हणणे आहे की, हवेची दिशा बदलू लागली आहे. कमी दबाच्या उत्तर क्षेत्रात आता उच्च दाबामुळे हवेचा वेग वाढला आहे. काल रात्री कोरडे वारे वेगाने वहात होते. यावेळी ’ला नीना’ ची स्थिति तयार होत आहे. यामुळे थंडीचा हंगाम मोठा असू शकतो. तसेच थंडीही कडाक्याची पडू शकते. याच कारणामुळे पाऊस देशात सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. तर अल नीनाच्या स्थितीत याच्या उलट होते.

या राज्यांतून परतला मान्सून
उत्तर पर्वतीय राज्य जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशातून मान्सून परतला आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता नाही.

शेतीसाठी खुप महत्वाचे
हिवाळा शेतीसाठी खुप महतवाचा असतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हीट अँड बारले रिसर्चचे संचालक डॉक्टर जीपी सिंह यांचे म्हणणे आहे की, थंडीला लवकर सुरूवात आणि हिवाळा मोठा असल्याने याचा सकारात्मक परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर होईल.