National Women Commission | NWC ची राज्य सरकारसह मुंबई पोलिसांवर टीका; चंद्रमुखी देवी म्हणाल्या – ‘मागील 2 वर्षापासून महिला आयोगाची स्थापना नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साकीनाक्यातील महिलेवरील बलात्कार प्रकरणातील (Saki Naka Rape Case) पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आज राष्ट्रीय महिला आयोगाची टीम (National Women Commission) साकीनाक्यात दाखल झाली. आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवींनी (Chandramukhi Devi) घटनास्थळी भेट देऊन पीडितेच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Women Commission) टीमने मुंबईत येऊन राज्य सरकार (Maharashtra Government) आणि मुंबई पोलिसांवर (Mumbai police) घणाघाती टीका केली.

गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची (State Women Commission) स्थापना नाही, असं म्हणत महाराष्ट्रात बलात्कारांच्या घटनामध्ये वाढ झाल्याचे चंद्रमुखी देवी यांनी सांगितले. उद्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांना आणि केंद्र सरकारला (Central Government) रिपोर्ट देणार आहोत, अशी माहिती चंद्रमुखी देवी यांनी दिली. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पीडीतेच्या कुटुंबीयांची आम्ही भेट घेतली असून पोलिसांकडून संबंधित घटनेची माहिती घेतली आहे. पीडितेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही जबाब नोंदवण्यात येणार आहे. यासोबत पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून विस्तृत माहिती जाणून घेऊ. त्यानंतर यावर चर्चा करता येऊ शकेल, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी सांगितले.

 

सरकार असंवेदनशील

राज्य महिला आयोग ही महत्त्वाची संस्था आहे. संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यात राज्य महिला आयोग आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाची नेमणूक करण्यात आली नाही. अशा वेळी कोणतीही पीडित महिला राज्य महिला आयोगाकडेच मदतीसाठी जाते. याठिकाणी अशी कोणतीच संस्था नाही जिथे महिला आपली बाजू मांडू शकतील. मला हे कळत नाही आहे की सरकार इतके असंवेदनशील कसं आहे की त्यांनी महिला आयोगाची स्थापना केलेली नाही, अशा शब्दात राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या चंद्रमुखी देवी यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे असे म्हणणारे सरकार हे पूर्णपणे असंवेदनशील आहे. या सरकारला महिलांची चिंता नाही. याबाबत राज्य सरकारने उत्तर द्यावे, असेही त्यांनी म्हटले.

पोलीस आयुक्तांचे वक्तव्य निंदनीय
पोलीस आयुक्तांनी (Police Commissioner) पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाही असं वक्तव्य केले.
त्यांचे हे वक्तव्य निंदनीय आहे. पोलीस सगळीकडे लक्ष ठेवू शकत नाही हे आम्हालाही समजते.
परंतु पोलिसांचा एक धाक असतो. तो पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलिसांची दहशत असते.
त्यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असतो. तो निर्माण करायला हवा.
ते न करता अशी विधान करणं चुकीचं असल्याचे चंद्रमुखी देवी यांनी म्हटले आहे.

Web Titel :- national women commission criticized mahavikas aghadi government and mumbai police Chandramukhi Devi said The Women’s Commission has not been established for the last 2 years

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA P.N. Patil | सहकार मंत्र्यांच्या पुतणीचा छळ, एक कोटीची मागणी ! आमदारासह मुला-मुलीवर गुन्हा

Pune Crime | पुण्यात कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करुन खंडणी मागणारे बाप-लेक गजाआड

PM Kisan Yojana | पुढील हप्त्यासोबत मिळवू शकता अडकलेला मागील हप्ता, जाणून घ्या कसा