DATA STORY : भारतामध्ये पोलिस दलात महिलांचा वाटा 16% वाढला, जाणून घ्या काय आहे राज्यांची स्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील पोलीस दलात महिलांचा वाटा 16.5 टक्क्यांनी वाढला आहे. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या अहवालात हा आकडा समोर आला आहे. आकडेवारीनुसार, देशातील एकूण पोलीस फोर्सची संख्या 20,91,488 आहे, त्यापैकी 2,15,504 महिला आहेत, म्हणजेच एकूण पोलीस दलात 10.3 टक्के महिला आहेत.

राज्यांपैकी बिहार पोलिसांमध्ये महिलांचा सर्वाधिक 25.3 टक्के वाटा आहे. बिहार पोलिसांमध्ये सिव्हिल पोलीस, जिल्हा सशस्त्र राखीव, विशेष सशस्त्र पोलीस आणि भारत राखीव बटालियन येतात. बिहारनंतर हिमाचल प्रदेशचा क्रमांक लागतो, जेथे महिलांचे प्रमाण 19.15 टक्के आहे. त्याखालोखाल चंदीगडचा क्रमांक लागतो, तेथे 18.78 टक्के आणि तामिळनाडूमध्ये 18.5 टक्के महिलांचे प्रमाण आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांत महिलांचा सर्वात कमी 3.31 टक्के हिस्सा आहे. त्यापाठोपाठ तेलंगणात 5.11 टक्के हिस्सा आहे. लक्षात घेण्यासारखे म्हणजे ही आकडेवारी 1 जानेवारी 2020 रोजीच्या आकलनावर आधारित आहे. अहवालानुसार एनआयएमध्ये एकूण 37 महिला आहेत, जे प्रमाण त्यांच्या एकूण संख्येच्या 4.64 टक्के आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) मध्ये एकूण 475 महिला असून, त्या एकूण संख्येच्या 7.96 टक्के आहेत.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांचा वाटा फक्त 2.9 टक्के आहे. 9.9 लाख वाल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांची एकूण संख्या 29,249 आहे, त्यापैकी सीआयएसएफमध्ये 8,631 महिला, सीआरपीएफमध्ये 7,860 आणि बीएसएफमध्ये 5,130 महिला आहेत. वाहतूक पोलिसांकडे राष्ट्रीय पातळीवर 5,979, स्पेशल ब्रँचमध्ये गुप्तचर प्रकरणांशी संबंधित 3,632, दहशतवाद, गंभीर घटना इत्यादींशी संबंधित प्रकरणांमध्ये 516 महिला तैनात आहेत.

इतकी पदे रिक्त आहेत
अहवालानुसार देशात 26.23 लाख पदे आहेत, त्यापैकी केवळ 20.91 लाख पदे भरली आहेत. म्हणजेच 5.31 लाखाहून अधिक पदे रिक्त आहेत. जेवढी पदे आहेत, ती सर्व पदे भरली असती तर आपल्याकडे 512 लोकांमागे एक पोलीस कर्मचारी राहिला असता. बिहारची लोकसंख्या 12 कोटींपेक्षा जास्त आहे. येथे 91 हजार 862 पोलीस आहेत. येथे 1,312 लोकांमागे एक पोलीस आहे. हा आकडा देशात सर्वाधिक आहे. दुसरा क्रमांक दमण-दीवचा आहे. येथील 4.30 लाख लोकसंख्येमागे 424 पोलीस आहेत. म्हणजेच 1014 लोकांमागे एक पोलीस आहे.

व्हीआयपी लोकांच्या सुरक्षिततेवर इतके पोलिस
बंगाल, पंजाब आणि बिहारमध्ये जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी व्हीआयपी सुरक्षेमध्ये गुंतलेले आहेत. सन 2019 मध्ये 19,467 पोलीस कर्मचारी खासदार, आमदार, न्यायाधीश आणि नोकरशहांसह इतर व्हीआयपींच्या संरक्षणामध्ये गुंतले होते. दादर-नगर हवेली आणि लक्षद्वीपमध्ये अनुक्रमे एक आणि पाच पोलीस व्हीआयपी सुरक्षेत गुंतले आहेत. बिहारमध्ये 5,611, पश्चिम बंगालमध्ये 6,247 आणि पंजाबमध्ये 7,714 पोलीस कर्मचारी व्हीआयपी सुरक्षेत गुंतले आहेत. आकडेवारी दर्शविते की 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये व्हीआयपींची संख्या कमी झाली आहे. जिथे 2018 मध्ये 21,300 व्हीआयपी होते, ते प्रमाण 2019 मध्ये खाली येऊन 19,467 झाले आहे. परंतु 2019 मध्ये व्हीआयपी सुरक्षेत तैनात असलेले पोलिस कर्मचारी 2018 च्या प्रमाणात वाढले आहेत. 2018 मध्ये, जिथे व्हीआयपी सिक्युरिटीमध्ये 63,061 पोलीस तैनात होते, ते 2019 मध्ये वाढून 66,043 झाले आहेत. दिल्लीत सर्वाधिक पोलीस कर्मचारी व्हीआयपी सुरक्षेवर तैनात आहेत. येथे 8,182 पोलीस कर्मचारी 501 व्हीआयपींच्या सुरक्षेवर तैनात आहेत. म्हणजेच 16 पोलीस एक व्हीआयपीच्या सुरक्षेवर आहेत. गोवा, ओरिसा आणि केरळमध्ये अनुक्रमे 32, 48 आणि 57 पोलीस कर्मचारी व्हीआयपी सुरक्षेत गुंतले आहेत.

अहवालानुसार पोलिस प्रशिक्षणात 2019-20 मध्ये देशाला 1,566.85 कोटी रुपये खर्च आला आहे. 2014-15 मध्ये प्रशिक्षणाच्या निधीमध्ये कमी आली होती, परंतु 2016 पासून त्यात सातत्याने वाढ झाली आहे. 2019 मध्ये प्रति 100 पोलीस कर्मचाऱ्यांवर वाहतुकीच्या सुविधेची टक्केवारी 7.74 होती, 2018 मध्ये ही टक्केवारी 7.89 होती.

पोलीस कर्मचार्‍यांजवळ इतके फॅमिली क्वार्टर
राज्य/ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या फॅमिली क्वार्टरमध्ये 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये 8.20 टक्क्यांनी घट झाली आहे. 2018 मध्ये, पोलीस कर्मचाऱ्यांकडे 7,05,892 फॅमिली क्वार्टर होते, जे 2019 मध्ये कमी होऊन 6,47,977 झाले. वेगवेगळी राज्य/ केंद्रशासित प्रदेशात एकूण 23 पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन आहेत. पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशन विविध राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील फॅमिली क्वार्टर आणि कार्यालयीन इमारतींशी संबंधित काम पाहते.