#MeToo : राष्ट्रीय महिला आयोगाकडून अनु मलिकला ‘क्लीन चीट’, पुराव्यांअभावी केस ‘बंद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय महिला आयोगाकडून चालवण्यात आलेली अनु मलिक यांची लैंगिक शोषणाची केस पुराव्याअभावी बंद करण्यात आली आहे. अनु मलिकवर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या यादीत सिंगर सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांसारख्या नावांचा समावेश आहे. 2018 मध्ये मीटू मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी अनु मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले.

एनसीडब्ल्यू अंडर सेक्रेटरी बरनाली शोमनं सोनी पिक्चर्स नेटवर्क्स् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड माधुरी मल्होत्राला पत्र लिहित सांगितलं की, सध्या प्रकरण बंद आहे. एका इंग्रजी रिपोर्टनुसार, पत्रात लिहलं होतं की, “आयोगाला या प्रकरणी 6 डिसेंबर 2019 रोजी आपली प्रतिक्रिया मिळाली आहे. सर्व काही लक्षात घेता मला तुम्हाला हे सांगण्यास सांगितलं आहे की, आयोगानं तक्रारदाराला मागितलेल्या पुराव्याच्या अभावानं ही केस बंद करण्यात आली आहे.”

आयोगाच्या चेअरमननं याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, “तक्रारीला उत्तर देताना आम्ही तक्रारदाराला लिखित स्वरूपात सांगितलं होतं. तिनं सांगितलं की, ती आता ट्रीपवर आहे. जेव्हा ती परत येईल तेव्हा ती आम्हाला भेटेल. आम्ही जवळपास 45 दिवस वाट पाहिली. आम्ही काही कागदपत्रांचीही मागणी केली होती. परंतु तक्रारदारानं कधी याला उत्तरच दिलं नाही.”

पुढे बोलताना चेअरमन म्हणाले, “तक्रारदार महिलेनं सांगिलं होतं की, अनु मलिक यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिला जास्त आहेत. आम्ही त्यांना सांगितलं की, तेही आमच्यासोबत तक्रार करू शकतात. परंतु त्यांच्यापैकी कोणीही काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तसं पाहिलं तर हा खटला कायमचा बंद झालेला नाही. जर तक्रारदार पुढे आली आणि त्यांनी आणखी पुरावे दिले तर किंवा काही डॉक्युमेंट जमा करत असेल तर आम्ही केस पुन्हा ओपन करू शकतो.” असंही त्यांनी सांगितलं

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like