Lockdown : Work From Home करणार्‍यांसाठी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिल्या काही महत्वपूर्ण ‘टीप्स’, आवश्य जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना विषाणूमुळे बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउन दरम्यान आवश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद आहे. रस्त्यावर शुकशुकाट आहे, पब, रेस्टॉरंट्स, कार्यालये, शॉपिंग मॉल्स, रस्त्यावरची बाजारपेठा सर्व बंद आहेत. अशा परिस्थितीत काही कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. जेणेकरून कंपनीला लॉकडाऊनमुळे होणारा तोटा कमी होईल. या सुविधेमुळे उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने त्या लोकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत जे याचा फायदा घेऊ शकतील. जागतिक आरोग्य संघटनेने एका ट्वीटद्वारे लोकांना याबद्दल माहिती दिली आहे.

एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करू नका.
बराच वेळ कम्प्युटर समोर बसू नका.
दर अर्ध्या तासाला किमान तीन मिनिटे उठा आणि आपल्या शरीराच्या मसल्सला स्ट्रेच करा.
डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून संगणकापासून काही अंतर ठेवा.
दर 15 किंवा 20 मिनिटांनी एकत्र आपले हात चोळा आणि थोड्या काळासाठी डोळ्यांवर ठेवा. असे केल्याने डोळ्यांना आराम मिळेल.

या ट्विटमध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केवळ घरातून काम करणाऱ्यांनाच सूचना दिल्या नाहीत तर घरातील इतर लोक स्वतःला निरोगी कसे ठेवू शकतात यासाठीही आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

आपल्या घराच्या पायऱ्यांवरून वर- खाली करा. हे किमान 4-5 वेळा करा. असे केल्याने शरीराचा थकवा कमी होईल आणि शरीरातील स्नायूही उघडतील.
घरात रिकामे बसतांना शरीराला थोडे स्ट्रेच करा. यासाठी, सर्वोत्तम वेळ सकाळी आणि संध्याकाळी आहे, परंतु जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण हे करू शकता.
घरात हलका व्यायाम केल्याने शरीराला बरीच शक्ती आणि सामर्थ्य मिळते. अशा परिस्थितीत म्युझिकसोबत डान्स हा एक उत्तम पर्याय आहे.