….म्हणून झाले फ्लिपकार्टचे 32 अब्जांचे नुकसान

बेंगळुरु : वृत्तसंस्था  – अॅमेझाॅनशी स्पर्धा फ्लिपकार्टला चागंलीच महागात पडल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे अॅमेझॉनशी स्पर्धा नडली अशी नडली की, फ्लिपकार्टचे तब्बल 32 अब्ज रुपयांचे नुकसान झाले. महत्त्वाचे म्हणजे 2006-17 च्या तुलनेत हे नुकसान 70 टक्क्यांनी जास्त आहे. सदर माहिती फ्लिपकार्ट इंडिया आणि फ्लिपकार्ट इंटरनेटच्या नियामक फाईलमधून मिळाली आहे.
सणसूद जवळ आला की, आॅनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना उधाण येते. डिस्काऊंटचा चक्क पाऊसच पाडला जातो. परंतु आज स्पर्धा खूप आहे. त्यामुळे प्रत्येक कंपनीला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी देणं अपेक्षित असतं. बऱ्याचदा यातून फायदा होतो तसेच काहींना नुकसानही सहन करावे लागते. असेच काहीसे फ्लिपकार्टचे झाले आहे. रिटेलर कंपनीची घाऊक विक्री करणआरी कंपनी फ्लिपकार्ट इंडियाचे नुकसान 75 पटींनी वाढून 2 हजार कोटी रुपये झाली आहे. तर ऑनलाईन व्यवहार सांभाळणारी कंपनी फ्लिपकार्ट इंटरनेटचे नुकसान 30 टक्क्यांनी घटून 1100 कोटी रुपये झाले आहे. मार्च 2017 मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात फ्लिपकार्ट इंडियाचे नुकसान 2016 पेक्षा घटून 244 कोटी रुपये राहिले होते. तर 2016 मध्ये हे नुकसान 545 कोटी झाले होते.

धक्कादायक असे की, गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानीचे खरे कारण कंपनीने अॅमेझॉनशी स्पर्धा करण्यासाठी विपनन आणि डिस्काऊंटचा केलेला वर्षाव आहे. जाणकारांच्या मतानुसार 2020 पर्यंत फ्लिपकार्टला नुकसान होतच राहणार आहे. फ्लिपकार्ट ही वॉलमार्टची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टवर ताबा मिळविल्यानंतर कंपनी आक्रमक झाली आहे.