करिना कपूर खान आहे ‘एवढ्या’ कोटींची मालकीण, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री करिना कपूर सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत असून, नव्या बाळाच्या स्वागतासाठी ती आतुर आहे. त्याव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीसाठी ती उत्सुक आहे. ते काय, तर तिचे ड्रीम होम

लवकरच करिना आपल्या ड्रीम होम मध्ये शिफ्ट होणार आहे. तिने अलीकडेच समाज माध्यमात तिच्या घराचे फोटो शेअर केले होते. सध्या या घराच्या रिनोवेशनचे काम सुरु आहे. नवाब सैफ अली खानची बेगम म्हणल्यावर करिनाला कशाची कमी, असा विचार तुम्ही कराल. मात्र, करिना स्वतःही काय कमी नाही. करिना बॉलिवूडमधील टॉप ५ महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

करिनाकडे २००४ साली ७४.४७ कोटींची संपत्ती होती. फोर्ब्जच्या सर्वात पॉवरफुल सेलिब्रिटींच्या यादीत तिने सातवा नंबर पटकवला होता. करिनाकडे आता ४१३ कोटींची संपत्ती आहे. करिना एका चित्रपटासाठी सुमारे १० ते १७ कोटी रुपये घेते. तर एका टीव्ही शो साठी ३ कोटी रुपये आकारते. तसेच करिनाला वेगवगेळ्या प्रकारच्या हॅण्डबॅग्ज खरेदी करायची आवड आहे. बिर्किन ३५ सुमारे १० लाखांची किंमत असणारी हँड बॅग करिना अनेकदा मिरवताना दिसते. तिच्याकडे अशा अनेक बॅग्जचे मोठे कलेक्शन आहे.

करिनाकडे टोयोटा, लँड क्रुझर, इटह असा एकापेक्षा एक महागड्या कार्स आहेत. त्यातील इटह ही कार सैफ अली खानने तिला गिफ्ट दिली आहे. दरम्यान, करिना लवकरच आमिर खानसोबत लाल सिंग चड्डा या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, थ्री इडियट्सनंतर दोघांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना लाभणार आहे.