‘शिवस्वराज’ घोषणा ! राष्ट्रवादीच्या आमदार, खासदारांचा महिन्याभराचा पगार पूरग्रस्तांसाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली – कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार तसेच आमदार १ महिन्याच्या पगाराची आर्थिक मदत करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली आहे. आज दुपारी अडीच वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील कार्यालयात मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली.

मंत्र्यांनी गांभीर्य ओळखावं

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ट्विटरवरून लिहिले आहे की, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, हे पूर पर्यटन नाही.मंत्र्यांनी जरा प्रसिद्धीचा सोस आवरावा आणि पूर परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करत आहेत.

अजित पवारांची टीका

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवस्वराज्ययात्रेमध्ये सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हंटले की, सांगलीच्या ब्रह्मनाळमध्ये ३० जणांनी भरलेली बोट उलटून १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.बोटीची क्षमता काय?किती व्यक्ती सामावू शकतात? याचा विचार या बेअक्कल सरकारला करायला नको? गेले ४ दिवस पाऊस पडतोय.यांना आता बचावकार्य सुचलं. या घटना शरमेनं मान खाली घालवणाऱ्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त