Nationalist Congress Party Pune | राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक अन् सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party Pune) कार्यालय उद्घाटनात कोरोनाचे नियम (Corona rules) भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आज शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्यासह कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. ही कारवाई सुरू आहे. दरम्यान पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अटकेची कारवाई झाल्यानंतर नियमानुसार पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party Pune) कार्यकर्त्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस (Shivajinagar Police) ठाण्यात युवक अध्यक्ष महेश रमेश हांडे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रदीप देशमुख सरचिटणीस रोहन पायगुडे, माजी नगरसेवक निलेश निकम, बाळासाहेब बोडके यांच्यासह 100 ते 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस आमलदार गणेश वीर यांनी तक्रार दिली होती.

शनिवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) नवीन कार्यलय उद्घाटन कार्यक्रम होता.
यादरम्यान महेश लांडे (Mahesh Lande) यांनी या कार्यक्रमाला स्पीकरची परवानगी मिळावी यासाठी पोलिसांकडे अर्ज केला होता.
त्या अर्जावर पुणे पोलिसांनी सर्व सूचना देऊन नियम पाळून कार्यक्रमाला परवानगी दिली होती.
तर त्यांना नोटीस देखील बजावली होती.
मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडलेल्या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.
400 ते 500 जण जमा झाले होते. तर यावेळी सोशल डिस्टसिंग (Social distance) तसेच अनेकांनी मास्क न घातल्याचे दिसून आले.
यादरम्यान या कार्यक्रमाचे गर्दी झालेले फोटो सोशल मीडियासह व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र टीकेची झोड उठली होती.
त्यानंतर पुणे पोलिसांनी रविवारी आयोजक व जमलेल्या दीडशे जणांवर गुन्हा दाखल केला होता.
आज सकाळीच शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप व काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
ही कारवाई सुरू असून, त्यांना अटक व नंतर नियमानुसार सुटका केली जाईल.
दरम्यान, पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे.

Web Title : Nationalist Congress Party Pune | NCP city president and former mayor Prashant Jagtap and other NCP workers arrested and released

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा