राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ‘एकत्र’ ! अजित पवारांसह फोटो ‘सेशन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे निर्माण झालेले वादळ अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने फडणवीस सरकार कोसळले. त्यानंतर रात्री उशीरा अजित पवार यांनी सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेले बंड शमले. बुधवारी सकाळी अजित पवार यांनी विधान भवनात प्रवेश केला. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दादांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्याबरोबर अनेकांनी फोटो सेशन केले.

खासदार सुप्रिया सुळे याही आज सकाळीच विधान भवनात पोहचल्या. त्या येणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना दिसत होत्या. पक्षातील बंड शमल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांवरील तणाव दूर झाल्याचे आज सकाळी दिसून येत होते. आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी एकमेकांशी गळाभेट घेऊन एकमेकांचे विधानसभात स्वागत केले.

अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली. तेव्हा त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला.
अजित पवार यांनी विधानसभेत येताच माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी योग्य वेळी बोलेन. मी राष्ट्रवादीमध्येच आहे. राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे. गेल्या काही दिवसात ज्या तिखट मीठ लावून बातम्या दिल्या जात होत्या. त्यामुळे मी चकीत झालो. पवार साहेब हे आमचे नेते आहेत. त्यांना आपण नेहमीच भेटत असतो. आम्ही नेहमीच आनंदात असतो. राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि कुटुंब वेगळ्या ठिकाणी आहे, असे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com