आंबेगाववर राष्ट्रवादीचेच वर्चस्व , दिलीप वळसे-पाटील तब्बल  सातव्यांदा विजयी

आंबेगाव : पोलीसनामा ऑनलाईन – सहा वेळा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यंदा सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी  66,359 मतांनी शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांच्यावर विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासूनच  वळसे-पाटील आघाडीवर होते.

राजाराम बाणखेले हे आंबेगाव पंचायत समितीचे अपक्ष सदस्य आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळविली होती. आक्रमक प्रचारामुळे ते चर्चेत आले होते.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे  नेते दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे ओळखला जातो. 1990 पासून ते आतापर्यंत दिलीप वळसे पाटील हेच आंबेगावचे आमदार आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच सहकारी संस्थांवर दिलीप वळसे-पाटील यांचे वर्चस्व आहे. तर, त्यांना विरोध करणारे शिवसेनेचे  माजी खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांचा पराभव झाल्याने शिवसेनेच्या संघटनेला मरगळ आली आहे.  आतापर्यंत दिलीप वळसे पाटील यांचा या मतदारसंघात एकदाही पराभव झाला नाही.

 

Visit : Policenama.com