व्हाट्सॲप यूजर्ससाठी खुशखबर! व्हाट्सॲप मध्ये ॲड होणार ‘हे’ नवीन सहा फिचर 

पोलिसनामा ऑनलाईन : व्हाट्सॲपने आजवर आपल्या युजर्सला खुश करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाही . कारण ह्या वर्षी व्हाट्सॲपकडून त्यांच्या यूजर्संना अनेक नवीन फिचर देण्याची तयारी केली आहे. त्यामध्ये  युजर्सची चॅट पद्धत बदली असून, काही दिवसात व्हाट्सॲप यूजर्संना नवीन फिचर देण्याच्या तयारीत आहे. जाणून घेऊया व्हाट्सॲपच्या नवीन फिचर बद्दल..

– नवीन फिचरच्या माध्यमातून व्हाट्सॲप यूजर्सला शेअर करता येईल आपली कॉन्टॅक्ट माहिती
क्यूआर कोडच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट माहिती शेअर करता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून यूजर्सला क्यूआर कोड जनरेट करण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे माहिती सेव्ह करता येईल. क्यूआर कोड जनरेट केल्यास व्हाट्सॲप ऑटोमॅटिक कॉन्टॅक्ट डीटेल रीड करुन ती यूजर्संच्या ॲड्रेस बूकमध्ये सेव्ह होणार आहे.

– पूश नोटिफिकेशनच्या माध्यमातून थेट पाहता येणार व्हाट्सॲप व्हिडिओ
या फीचरच्या माध्यमातून यूजर्सला व्हिडिओ आल्याचा संदेश मिळाल्यास त्याच्या नोटिफिकेशनवरुनच व्हिडिओ प्ले करता येणार आहे. हे फिचर सध्या आयओएसमध्ये देण्यात आले आहे. लवकरच हे फीचर अॅण्ड्रॉइड फोनमध्येही येणार आहे.

– दोन ते तीन लोकांच्यासोबत शेअर करता येणार मल्टीमीडिया फाईल्स 

या फिचरच्या माध्यमातून यूजर्सला दोन ते तीन लोकांच्यासोबत मल्टीमीडिया फाईल्स शेअर करता येणार आहे. तसेच या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संदेश पाठविण्याआधी पाहता येणार आहे.

– ग्रुप कॉलिंगचा शॉर्टकट
हे फिचर आयओएस यूजर्सला देण्यात आले आहे. ग्रुप कॉलिंग शॉर्टकटसाठी ग्रुप चॅटबॉक्सच्या वरती डाव्या बाजूला व्हिडिओ कॉल आणि व्हॉईस कॉलचाऑप्शन दिसेल. याला टॅप केल्यास ग्रुपच्या सर्व सदस्यांना एक सूची येईल. या सूचीतून यूजर्सला ३ लोकांच्यासोबत ग्रुप कॉल करता येणार आहे.

– डार्क मोड

 या फीचरमुळे व्हाट्सॲपचे बॉकग्राउंड डार्क होणार आहे. हे फीचर याआधी यूट्यूब, गूगल, ट्विटरवर आपण पाहिले आहे. हे फीचर याआधी अॅण्ड्रॉइड व आयओएसवर पाहण्यात आले आहे. लवकरच हे व्हाट्सॲप यूजर्ससाठी उपल्बध होणार आहे.

– आता येणार रेटींगचे फीचर
या फिचरच्या माध्यमातून यूजर्सला माहिती मिळणार आहे की आपण सर्वात जास्त कोणासोबत चॅट करतो आहे. या फिचरच्या माध्यमातून कॉन्टेक्ट नबंरचा क्रम तयार होणार आहे. ज्या व्यक्तीला यूजर्स सर्वात जास्त मीडिया फाईल्स पाठवेल व स्वीकारेल त्याला चांगली रॅंन्क, रेटींग देण्यात येईल. अशीच प्रक्रिया संदेशाच्या बाबतीत असणार आहे.

– आता व्हॉटसॲपवर करता येणार कॉन्टॅक्ट ॲड
या फिचरच्या माध्यमातून व्हाट्सॲपमध्ये कॉन्टॅक्ट समाविष्ट करता येणार आहे. हे फिचर वापरात आल्यास यूजर्सला  केवळ त्या देशाला सिलेक्ट करावे लागणार आहे ,ज्या देशातील नंबर आहे. असे करताच व्हाट्सॲप ॲटोमॅटिकली त्या देशाचा कोड इनसर्ट होणार आहे. यानंतर यूजर्सला फक्त फोन नंबर टाकावा लागणार आहे.