कामगारांच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील महसूल कर्मचारी होणार सहभागी

थेऊर – कामगारांच्या देशव्यापी संपात पुणे जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी सहभागी होणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून या पत्रावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांच्या सह जिल्हाध्यक्ष श्रीनिवास कंडेपल्ली, उपाध्यक्ष सचिन तारु, सरचिटणीस सचिन तांबोळी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

देशातील सुमारे वीस कोटी कर्मचारी उद्या गुरुवारी एक दिवसाच्या संपावर जाणार असून त्यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधले आहे यामध्ये सन 1982 ची जुनी सेवानिवृत्ती योजना सर्व कामगारांना लागू कराव्यात, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, शहर भत्ता, अतिकालीक भत्ता व इतर भत्ते राज्य कर्मचार्यांना सत्वर लागू करावेत, मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या जाचक अटी धोरण करावे, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरावीत, रद्द, व्यपगत पदे पुनर्जिवीत करावीत या व इतर मागण्यासाठी संप पुकारला आहे.