Native Cow Test Tube Baby | होलस्टीन फ्रिजन गायीच्या पोटी देशी ‘साहिवाल’, पुण्यात देशी गायीच्या टेस्ट ट्यूब बेबीचा पहिला प्रयोग यशस्वी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Native Cow Test Tube Baby | देशी गायींचे संवर्धन जलद गतीने होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कृषी विद्यापीठांच्या (Agricultural University) स्तरावर पुण्यात गायींमध्ये ही टेस्ट ट्यूब बेबीचा (Native Cow Test Tube Baby) प्रयोग राबवण्यात आला आहे. पुण्यातील हा पहिलाच प्रयोग (First Experiment in Pune) असून तो यशस्वी झाला आहे. होलस्टीन फ्रिजन गायीच्या (Holstein Friesian cow) पोटी अधिक दूध देणाऱ्या सहिवाल (Sahiwal) जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे.

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे (Mahatma Phule Agricultural University, Pune) येथील देशी गाय संशोधन केंद्रात देशी गायींच्या टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग राबवण्यात आला. या ठिकाणी शुक्रवारी एका होलस्टीन फ्रिजन गाईने सुदृढ देशी साहिवाल कालवडीला जन्म दिला आहे. जन्मावेळी या कालवडीचे वजन 27 किलो होते. याच केंद्रामध्ये मागील महिन्यात होलस्टीन फ्रिजन गाईच्या पोटी गीर (Gir) जातीच्या कालवडीने जन्म घेतला होता.

 

जास्त दूध देणाऱ्या जातीच्या गाईंवर संशोधन
देशामध्ये गाईंच्या एकूण 50 स्थानिक जाती आहेत. यामध्ये साहिवाल, गीर, राठी, लाल सिंधी व थारपारकर या पाच जातींचे दुधासाठी संगोपन करण्यात येते. साहिवाल आणि राठी या दूधासाठी चांगल्या आहेत. साहिवाल ही जात दिवसातून दोन वेळा 14 ते 16 लीटर दूध देऊ शकते. तर राठी ही राजस्थानमधील जात असून मराठवाडा आणि विदर्भात चांगल्या प्रकारे दूध देऊ शकतात. यामुळे या केंद्रावर या दोन जातींबाबत संशोधन सुरु आहे.

किती येतो खर्च?
या तंत्रासाठी शेतकऱ्यांना 20 ते 22 हजार रुपये खर्च येतो. यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक सहकार्य मिळते.
पहिल्यांदा विणाऱ्या गाईमध्ये हा प्रयोग केला तर तो यशस्वी होण्याचे प्रमाण 50 टक्के आहे.
जास्त वेत असलेल्या गायीमध्ये हेच प्रमाण 30-35 टक्के आहे.

 

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने (Dr. Somnath Mane) यांनी सांगितले,
गीर ही जात ठरावीक वातावरणात चांगले दूध देते. साहिवाल ही जात कमी चारा खाते,
कमी आजारी पडते आणि जास्त दूध देते. त्यामुळे या जातीच्या संवर्धनासाठी हा प्रयोग राबवण्यात आला.
यामुळे शेतकऱ्यांना देशी वंशावळ असलेल्या स्थानिक वातावरणात चांगले दूध उत्पादन देणाऱ्या गाई उपलब्ध होऊ शकतील.

 

Web Title :- Native Cow Test Tube Baby | test tube baby of a native cow was done for the first time pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

MoRTH | RTO च्या 58 सुविधा आता घरबसल्या मिळतील, ड्रायव्हिंग लायसन्स (DL) सारख्या सुविधांसाठी माराव्या लागणार नाहीत फेर्‍या

Pune Crime | गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, 8 दिवसांपासून होता बेपत्ता; लोणी काळभोर परिसरातील घटना